सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

हिंदी भाषेतील पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतांना श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ. त्यांच्या बाजूला श्री. रमेश शिंदे आणि श्री. चेतन राजहंस

रामनाथी (गोवा) – ‘सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा आहे. सनातन धर्माचे वैज्ञानिक कार्य सनातनच्या आश्रमात होत आहे’, असे कौतुकोद्गार सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी काढले. २८ नोव्हेंबर या दिवशी त्यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी श्री. कुलश्रेष्ठ यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म कार्याची ओळख करून दिली. आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि समाजोद्धारक कार्य, तसेच आश्रमातील सुव्यवस्थापन पाहून ते अत्यंत प्रभावित झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हेही उपस्थित होते. या प्रसंगी श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’ आणि ‘धर्मशिक्षा फलक’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’ आणि ‘धर्मशिक्षा फलक’ हा ग्रंथ भेट देताना श्री. रमेश शिंदे

 

क्षणचित्र 

तुम्ही अत्यंत चांगले काम करत आहात, जे आजच्या काळात अशक्य आहे ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

या वेळी श्री. कुलश्रेष्ठ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाला भेट दिली. पत्रकारितेच्या क्षेत्रातील कोणताही पूर्वानुभव नसतांना आणि पूर्णकालीन विनावेतन सेवा करणार्‍या सनातन प्रभातच्या कार्यालयातील साधकांना पाहून श्री. कुलश्रेष्ठ प्रभावित झाले. ‘तुम्ही अत्यंत चांगले काम करत आहात, जे आजच्या काळात अशक्य आहे’, असै गौरवोद्गारही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment