रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाची शक्यता

Article also available in :

रशियाकडून युरोपच्या सीमेवर शस्त्रास्त्रे आणि सैन्य, तर अमेरिकेकडून युद्धनौका तैनात !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत. यातच अमेरिकेनेही त्यांच्या युद्धनौका तेथील समुद्रात तैनात केल्याने तणाव आणखी वाढला आहे. वोरोनेझ शहराजवळ रशियाचे सहस्रो सैनिक जमले आहेत. वोरोनेझ हे शहर युक्रेनच्या सीमेपासून ३२० किमी दूर आहे. यावरून रशिया युद्धाची सिद्धता करत असल्याचे दिसून येत आहे.


संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment