धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

 

१. धनत्रयोदशीचे महत्त्व

‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी ! या दिवशी मनुष्याचे सुरळीतपणे पोषण होण्यासाठी साहाय्य करणार्‍या धनाची (संपत्तीची) पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या दृष्टीने धनत्रयोदशीपासून नववर्षाला आरंभ होत असल्याने ते या दिवशी तिजोरीचे पूजन करतात. सत्कार्याला धन अर्पण करणे, हीच लक्ष्मीची खरी पूजा होय. धर्मशास्त्रानुसार ‘मनुष्याने स्वतःच्या मिळकतीतील १/६ भाग प्रभु कार्यासाठी व्यय करावा’, असे म्हटले जाते.

धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.

 

२. सत्कार्यासाठी, म्हणजे धर्मप्रसाराच्या
कार्यासाठी धनाचा विनियोग व्हावा, यासाठी ‘सत्पात्रे दान’ करा !

सध्या धर्माची स्थिती बिकट आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंचा धर्माभिमान नष्ट झाला आहे. त्यामुळे ‘धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य करणे’, हे या काळातील प्रभुकार्य असून ते अग्रक्रमाने करणे आवश्यक बनले आहे. धर्मप्रसार करणारे संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्‍या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हे काळानुसार सर्वश्रेष्ठ दान होय. गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्था धर्मजागृतीचे कार्य निरपेक्ष वृत्तीने करत आहे. अर्पणदात्यांनी सनातन संस्थेला केलेल्या दानाचा (अर्पणाचा) विनियोग धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच होणार, हे निश्चित !

धनत्रयोदशीच्या निमित्ताने दान करण्यास इच्छुक दात्यांनी स्वतःची माहिती कळवावी.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन ४०३४०१

https://www.sanatan.org/en/donate  येथेही दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment