अनुक्रमणिका
१. दत्ताचा परीवार आणि त्याचा भावार्थ
अ. वृक्ष, गाय, श्वान
दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. गाय आणि कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात.
आ. झोळी
दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे – झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.
इ. कमंडलू
ई. त्रिशूळ
त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही.
२. दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व
‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो. पादुकांतील निर्गुण तत्त्वामुळे साधकाचे मन, चित्त, बुद्धी आणि अहं या सूक्ष्म-देहांची शुद्धी होते. त्यामुळे दत्तभक्त दत्ताच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी, म्हणजेच दत्ततत्त्वाशी लवकर एकरूप होतो.’
३. दत्ताचे २४ गुण-गुरु
दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले. दत्ताच्या २४ गुरूंविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पहा – https://www.sanatan.org/mr/a/838.html
४. दत्ताचे अवतार
अ. दत्ताचे प्रमुख अवतार
अ. श्रीपाद श्रीवल्लभ, आ. श्री नृसिंह सरस्वती इ. श्री माणिकप्रभु ई. श्री स्वामी समर्थ उ. श्री साईबाबा ऊ. श्री भालचंद्र महाराज
श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार. यांनी पंधराव्या शतकात महाराष्ट्रात दत्तोपासना सुरू केली. श्री नृसिंह सरस्वती हा दत्ताचा दुसरा अवतार. श्री गुरुचरित्रात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांची विस्तृत माहिती आहे.
आ. दत्तात्रेयांचे १६ अंशअंशात्मक अवतार
योगिराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्निशमन, योगिजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्रीमायामुक्त, आदिगुरु, शिवरूप, देवदेव, दिगंबर, कृष्णश्यामकमलनयन, हे दत्तात्रेयांचे १६ अवतार अंशअंशात्मक होते.- (संदर्भ : भक्तीकोष)