चिक्कमगळुरू (कर्नाटक) – श्री आदिशंकराचार्य शारदा लक्ष्मी नरसिंह पीठ, हरिहरपूरचे पीठाधिपति श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी यांची ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी महास्वामीजींना सनातनच्या ग्रंथांविषयी, पंचांगाविषयी माहिती देण्यात आली. अत्यंत आत्मियतेने त्यांनी सर्व समजून घेतले आणि ‘सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे’, असे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सौ. शारदा योगीश, श्रीमती ललितम्मा तिम्मप्पय्या आणि धर्मप्रेमी डॉ. योगीश हे उपस्थित होते. सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथांचा लाभ समाजातील अधिकाधिक लोकांना व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.
Home > आमच्याविषयी > अभिप्राय > आश्रमाविषयी > संतांचे आशीर्वाद > सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी
सनातन संस्था उत्तम रितीने धर्मकार्य करत आहे ! – श्री श्री स्वयंप्रकाश सच्चिदानंद सरस्वती महास्वामीजी
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- नागपूर येथील श्री सिद्धारुढ शिवमंदिराचे श्री शिवशंकर स्वामीजी यांची सनातन आश्रम, रामनाथी येथे सदिच्छा भेट
- पुणे येथील अष्टांग योगी संत श्री शिवोकांत स्वामीजी यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
- हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्या सनातन संस्थेसारख्या अनेक संस्थांची आवश्यकता ! – पू. कृष्णात डोणे महाराज...
- शीख परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
- श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या...
- हिंदूंना धर्मज्ञान देण्याचे सनातन संस्थेचे कार्य स्तुत्य ! – श्री श्री विदुशेखर भारती महास्वामीजी, उत्तराधिकारी,...