सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की,
१. हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि हिंदु धर्माला गौण लेखण्याची प्रौढी यांमुळे बर्याच वेळा श्राद्धविधी दुर्लक्षिला जातो; पण आजही अनेक पाश्चात्त्य देशांतील सहस्रो लोक भारतातील तीर्थक्षेत्री येऊन पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी श्रद्धेने श्राद्धविधी करतात.
२. ज्यांनी प्रथम श्राद्धविधी केला, ते ‘मनू’, ‘राजा भगीरथ’ यांनी पूर्वजांच्या मुक्तीसाठी केलेली कठोर तपश्चर्या, तसेच त्रेतायुगातील प्रभु श्रीरामाच्या काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही श्राद्धविधी केल्याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे तथाकथित पुरोगाम्यांच्या श्राद्धाविषयीच्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या क्षमतेनुसार पितृऋण फेडण्यासाठी श्रद्धापूर्वक ‘श्राद्धविधी’ करा.
३. श्राद्ध न केल्यास आपले पूर्वज अतृप्त रहातात. त्यामुळे दोष निर्माण होतात. पूर्वजांना मर्त्य लोकांतून पुढे जाण्यासाठी श्राद्ध विधीमुळे ऊर्जा मिळते. मृत्यूनंतरही सद्गतीसाठी श्राद्धविधी सांगणारा हिंदु धर्म हा एकमेवाद्वितीय आहे.
४. सध्या समाजात धर्मशिक्षणाच्या अभावाने ‘श्राद्ध करण्याऐवजी सामाजिक संस्था किंवा अनाथालये यांना देणगी द्या’, अशा चुकीच्या संकल्पनांचा प्रचार केला जातो; मात्र असे करणे अयोग्य आहे. धार्मिक कृती या धर्मशास्त्रानुसारच होणे आवश्यक असते. त्यानुसार कृती केल्यासच पितृऋण फिटते.