सण, धार्मिक उत्सव आणि व्रते वरवर जरी एकसारखे वाटत असले, तरी या तिघांमध्ये काही प्रमाणात भेद असतो. हा भेद खालील कोष्टकाच्या आधारे समजून घेऊया.
सण |
धार्मिक उत्सव |
व्रत |
|
१. व्याख्या | ज्या दिवशी ब्रह्मांडात निर्गुण लोकातील सत्त्वावरील सात्त्विक लहरींचे, त्या त्या देवतेचे तत्त्व घेऊन आगमन सहजमार्गाने होते, तो दिवस म्हणजे ‘सण’. (सण साजरे करणारे जीव सहजमार्गी असतात.) | ज्या दिवशी ब्रह्मांडात सगुण लोकातील सात्त्विक लहरींचे, त्या त्या देवतेचे तत्त्व घेऊन आगमन होते, तो दिवस म्हणजे ‘उत्सव’. | उन्नत जिवांनी जिवांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निर्मिलेला एक कर्ममार्ग म्हणजे ‘व्रत’. |
२. महत्त्व | ५० टक्के साधना म्हणून सण साजरा करणार्या जिवांना या दिवशी ब्रह्मांडात येणार्या निर्गुण लोकातील सत्त्वावरील सात्त्विक लहरींचा फायदा मिळणे | ३० टक्के भक्तिभावाने साधना म्हणून उत्सव साजरा करणार्या जिवांना या दिवशी ब्रह्मांडात येणार्या सगुण लोकातील त्या त्या देवतांच्या सात्त्विक कार्यरत लहरींचा फायदा मिळणे | १० टक्के या दिवशी ब्रह्मांडात असणार्या त्या त्या देवतेच्या शक्तिलहरी जिवाच्या भावाप्रमाणे कार्यरत होऊन व्रत करणार्या जिवाला फायदा मिळणे |
३. मार्ग | गुरुकृपायोग (सहजमार्ग) | भक्तिमार्ग | कर्ममार्ग (टीप १) |
४. लहरींचा प्रवाह | सहज आणि शांत | जलद आणि रजोगुणी | जलद आणि रज-तमोगुणी |
५. लाभ | जीव सात्त्विक बनणे | जीव रज-सत्त्वगुणी बनणे | जीव रज-तमोगुणी बनणे (टीप २) |
६. अनुभूति | शांति | आनंद आणि चैतन्य | शक्ति |
टीप १ : ‘व्रत करणे’ म्हणजे कर्मकांड. कर्मकांड किंवा उपासनाकांड यांनुसार साधना करणार्या जिवांची उन्नती जलद होऊ शकत नाही. उलट अहं वाढण्याचा सर्वांत जास्त धोका कर्मकांडात असतो. कर्मकांड म्हणजे केवळ शक्तीची उपासना. (मूळस्थानी)
टीप २ : बहुसंख्य व्रते सकाम उद्देशांनी केली जातात. असे करणे हे मायेतील असल्याने आणि माया तमोगुणप्रधान असल्याने व्रतांमुळे जीव रज-तमोगुणी बनतो. (मूळस्थानी)
– श्री गुरुतत्त्व (८.४.२००४, दुपारी २.५१)