सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणारे साधक, तसेच प्रसारसेवा करणारे साधक अन् त्यांचे कुटुंबीय यांना आपत्काळात तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी ३ रुग्णवाहिकांची आवश्यकता !

साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !


‘महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आदी प्रदेशांत सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे आहेत. तेथे पूर्णवेळ साधना करणारे अनेक साधक आणि त्यांचे कुटुंबीय रहातात. सनातनचे कार्य भारतभर विस्तारलेले असल्याने वरील ठिकाणी, तसेच अन्यत्रही घरी कुटुंबियांसमवेत रहाणार्‍या सनातनच्या साधकांची संख्याही बरीच आहे.

मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वत्र आपत्कालीन स्थिती उद्भवली आहे. अनेक ठिकाणी साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांना तातडीने रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) उपलब्ध होण्यात अडचणी आल्या. गंभीर अवस्थेतील रुग्णाला रुग्णालयात नेण्यास अथवा अधिक कुशलतेचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी अन्यत्र हलवणे, यांसाठी रुग्णवाहिका त्वरित आणि सहज उपलब्ध होणे अनिवार्य असते.

अशा आपत्कालीन स्थितीचा विचार करता सनातनच्या विविध आश्रमांसाठी ३ रुग्णवाहिकांची तातडीने आवश्यकता आहे. वैद्यकीय सुविधा आणि अन्य तांत्रिक गोष्टी यांचा विचार करता ‘फोर्स’ (FORCE) या आस्थापनाच्या ‘बेसिक लाईफ सपोर्ट टाईप सी’ (Basic Life Support Type C) या ३ रुग्णवाहिकांची खरेदी करावयाची आहे. या एका रुग्णवाहिकेचे अंदाजे मूल्य २३ लाख रुपये इतके आहे. सुस्थितीतील रुग्णवाहिका असल्यास आणि ती अर्पण स्वरूपात देऊ शकत असल्यास तसेही कळवावे.

रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी
धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने काढावा.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment