‘श्रीमद्भगवद्गीते’चे महत्त्व जाणा ! बुद्धीप्रामाण्यवाद्यांना या घटनेविषयी काय म्हणायचे आहे ?
पाथर्डी (जिल्हा नगर) – ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावनामुळे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील श्री. गोरक्ष कारकिले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्य वाहून गेले, तसेच त्यांच्या पशूधनाचीही मोठी हानी झाली आहे; मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरामध्ये नियमित पूजन करण्यात येणारा ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ ५ फूट पुराच्या पाण्यात रात्रभर वहात असूनही त्याचे एकही पान ओले झाले नाही.
मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. या घटनेने ‘बैसुनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी’ या उक्तीची प्रचीती कारकिले कुटुंबियांनी घेतली आहे. ‘श्रीमद्भगवद्गीता’ पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिचे प्रत्येक पान कोरडे असल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.