साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध जिल्ह्यांत औषधी वनस्पतींची लागवड चालू आहे. साधक घरोघरी कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत. काही साधक आपल्या शेतातील काही भागात औषधी वनस्पती लावत आहेत. स्थानिक स्तरावर साधकांना कुंड्यांमध्ये माती कशी भरावी ? खत कसे बनवावे ? झाड कसे लावावे ? बियाणे कसे रुजत घालावे ? रोपे कशी वाढवावीत ? रोपांचे किडींपासून संरक्षण कसे करावे ? शेतजमिनीत लागवड कशी करावी ? यांविषयी प्रत्यक्ष प्रायोगिक प्रशिक्षण देण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची आवश्यकता आहे. जे साधक, वाचक आणि हितचिंतक यांना याविषयी अनुभव असून जे याविषयी स्थानिक स्तरावर किंवा ‘ऑनलाईन’ शिबिरात मार्गदर्शन करू शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आपली माहिती पाठवावी.
टपालाचा पत्ता : श्री. विष्णु जाधव, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
संगणकीय पत्ता : [email protected]
यात काही शंका असल्यास श्री. विष्णु जाधव यांच्याशी ८२०८५१४७९१ या क्रमांकावर संपर्क करावा.’
– (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.