चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य

मिरज – चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. या साहाय्यसाठी हातभार म्हणून ‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांसाठी सुमारे ३५ सहस्र रुपयांची औषधे अर्पण केली. असोसिएशनच्या वतीने श्री. मुकुंद माळी, श्री. कोळसे-पाटील आणि त्यांचे दोन सहकारी यांच्या हस्ते ही औषधे सनातन संस्थेच्या वैद्या श्रीमती मृणालीनी भोसले यांनी स्वीकारली. (स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे ! इतरांनीही त्यातून प्रेरणा घेऊन समाजबांधवांना साहाय्य करावे ! – संपादक)