अनुक्रमणिका
- १. श्री वैद्यनाथेश्वर शिव मंदिराचा इतिहास
- २. एक सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असलेले चोल राजांच्या काळातील मंदिर !
- ३. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री वैद्यनाथेश्वर मंदिराला दिली भेट !
- ४. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतलेले श्री वैद्यनाथेश्वराचे दर्शन हे दैवी नियोजन असल्याची अनुभूती येणे
- ५. ‘कोरोनासारख्या विषाणूंपासून साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री वैद्यनाथेश्वर शिवाला प्रार्थना करणे
- ६. मंदिराच्या विश्वस्तांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा शाल अर्पण करून आणि हार घालून सन्मान केला.
- ७. क्षणचित्रे
- ८. अनुभूती
- ८ अ. मंदिरात देवासमोर बसल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शिवलिंगात पाचूच्या रंगातील नृत्य करणार्या शिवाचे दर्शन होणे आणि ‘या मंदिरापासून ३० कि.मी. दूर असलेले ‘कुणिगल’ नावाचे गाव हे शिवाचे नृत्यक्षेत्र आहे’, असे सहसाधकाने सांगणे
- ८ आ. मंदिरात गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून सहस्रो नागांचे दर्शन होणे, प्रत्यक्षातही तेथे एका दैवी नागाचे अस्तित्व असणे आणि मंदिरात शौच-अशौच न पाळल्यास नागाने मंदिरात येऊन कुणालाही आत न सोडणे
१. श्री वैद्यनाथेश्वर शिव मंदिराचा इतिहास
१ अ. अरेयूरु येथील शिवाला ‘श्री वैद्यनाथेश्वर’ नाव पडण्यामागील कारण
सहस्रो वर्षांपूर्वी हिमालयातून आलेल्या दधीचिऋषींनी या ठिकाणी एक आश्रम बांधला होता. त्या आश्रमात त्यांनी एका ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. या आश्रमात दधीचिऋषि अन्य ऋषींच्या समवेत दैवी वनस्पतींपासून औषधे सिद्ध करत असत. त्यामुळे येथील शिवाला ‘श्री वैद्यनाथेश्वर’ असे नाव पडले.
२. एक सहस्र वर्षांहून अधिक प्राचीन असलेले चोल राजांच्या काळातील मंदिर !
हे मंदिर कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरूपासून ९० कि.मी. दूर तुमकुरू जिल्ह्यातील ‘अरेयूरु’ या निसर्गरम्य गावात आहे. आताचे मंदिर चोल राजांच्या काळातील असून ते एक सहस्र वर्षांपेक्षाही अधिक प्राचीन आहे. येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर दिवा ठेवल्यावर दिव्याची ज्योत शिवलिंगावर दिसते. या अर्थानेही स्थानिक लोक या शिवलिंगाला ‘ज्योतिर्लिंग’ असे म्हणत असावेत.
३. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री वैद्यनाथेश्वर मंदिराला दिली भेट !
‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीतून सांगितले होते, ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३.७.२०२१ या दिवशी) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या प्रतिमेचे पूजन करतील. त्याच वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील तुमकुरू जिल्ह्यातील अरेयूरु गावात असलेल्या श्री वैद्यनाथेश्वर शिवाचे दर्शन घ्यावे. त्या वेळी त्यांनी शिवलिंगावर अभिषेक करावा आणि त्याची पूजा करावी अन् वेदांतील ‘चमकम्’ हे मंत्र ऐकावेत, तसेच सर्वत्रच्या सनातनच्या साधकांच्या आरोग्यासाठी शिवाला प्रार्थना करावी.’
४. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
यांनी घेतलेले श्री वैद्यनाथेश्वराचे दर्शन हे दैवी नियोजन असल्याची अनुभूती येणे
सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे २३.७.२०२१ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री वैद्यनाथेश्वर मंदिरात पोचल्या. त्या वेळी शिवलिंगावर अभिषेक चालू होता. काही वेळाने पुजार्यांनी वेदांतील ‘चमकम्’ हे मंत्र म्हटले. तेव्हा ‘हे सर्व दैवी योजनेप्रमाणे चालू आहे’, अशी अनुभूती आम्हा साधकांना आली.
५. ‘कोरोनासारख्या विषाणूंपासून साधकांचे रक्षण व्हावे’,
यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री वैद्यनाथेश्वर शिवाला प्रार्थना करणे
‘आपत्काळाला आरंभ झाल्याने साधकांना वैद्यनाथ शिवाचे आशीर्वाद आवश्यक आहेत; म्हणून सप्तर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री वैद्यनाथेश्वर मंदिरात पाठवले’, असे मला जाणवले. ‘कोरोनासारख्या विषाणूंपासून सर्व साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री वैद्यनाथेश्वर शिवाला प्रार्थना केली.
६. मंदिराच्या विश्वस्तांनी श्रीचित्शक्ति
(सौ.) अंजली गाडगीळ यांचा शाल अर्पण करून आणि हार घालून सन्मान केला.
७. क्षणचित्रे
७ अ. वरुणाशीर्वाद
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ चारचाकीने मंदिरासमोर आल्यावर पुष्पवृष्टी झाल्यासारखा पाऊस पडला. याविषयी महर्षींना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘हा वरुणाशीर्वादच होता.’
७ आ. विश्वस्तांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सप्तर्षींनी दिलेले स्फटिकाचे शिवलिंग
श्री वैद्यनाथेश्वर शिवलिंगाच्या बाजूला ठेवण्यास आणि त्यावरही अभिषेक करण्यास पुजार्यांना सांगणे
या वेळी मंदिराचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. त्यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवासमोर बसता येण्यासाठी सर्व व्यवस्था केली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सप्तर्षींनी स्फटिकाचे शिवलिंग दिले आहे. शिवलिंग गेल्या ६ पिढ्यांपासून पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांच्या घराण्याच्या पूजेत होते. शिवलिंग विश्वस्तांना दाखवल्यावर त्यांनी ते श्री वैद्यनाथेश्वर शिवलिंगाच्या बाजूला ठेवून पुजार्यांना शिवलिंगावर अभिषेक करायला सांगितला.
८. अनुभूती
८ अ. मंदिरात देवासमोर बसल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
यांना शिवलिंगात पाचूच्या रंगातील नृत्य करणार्या शिवाचे दर्शन होणे आणि ‘या मंदिरापासून
३० कि.मी. दूर असलेले ‘कुणिगल’ नावाचे गाव हे शिवाचे नृत्यक्षेत्र आहे’, असे सहसाधकाने सांगणे
मंदिरात देवासमोर बसल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शिवलिंगात साक्षात् नृत्य करणार्या शिवाचे पहिल्यांदाच दर्शन झाले. त्यांना शिवाचा रंग पाचूसारखा दिसला. त्या म्हणाल्या, ‘‘शिवाची आरती चालू असतांना शिव नृत्य करत आहे आणि मी पार्वती होऊन ते नृत्य पहात आहे’, असे जाणवले. काही वेळाने ‘मी कालीमाता आहे’, असे जाणवले. कालीमाता नर्तन करतांना तिच्या गळ्यातील रूंडमाळ (कवट्यांची माळ) झुलत असल्याचे जाणवत होते. ‘माझे १ रूप कालीमातेच्या रूपात नर्तन करत असून १ रूप ते नर्तन पहात आहे’, असे काही सेकंद जाणवले.’’
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ही अनुभूती आम्हाला सांगितली. तेव्हा सहसाधक श्री. विनीत देसाई म्हणाले, ‘मंदिरापासून ३० कि.मी. दूर कुणिगल हे गाव आहे. कुणिगल हे शिवाचे नृत्यक्षेत्र आहे. कन्नड भाषेत ‘कुणि’ म्हणजे ‘नृत्य’ आणि ‘गल’ म्हणजे ‘दगड’. प्राचीन काळात एकदा शिव आणि पार्वती येथे आले होते. त्यांनी या क्षेत्रात नृत्य केल्याने गावाला ‘नर्तनपुरी’ असे नाव पडले. गावच्या तलावातील पाण्याची पातळी वाढली की, तलावातील दगड वर-खाली होतांना दिसायचे. यावरून लोकांनी ‘कुणिगल’ म्हणजे ‘नृत्य करणारे दगड’ असे गावाचे नाव ठेवले.’’ त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शिवलिंगात नृत्य करणार्या शिवाचे दर्शन का झाले, यामागील कार्यकारणभाव लक्षात आला.
८ आ. मंदिरात गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
यांना सूक्ष्मातून सहस्रो नागांचे दर्शन होणे, प्रत्यक्षातही तेथे एका दैवी नागाचे अस्तित्व
असणे आणि मंदिरात शौच-अशौच न पाळल्यास नागाने मंदिरात येऊन कुणालाही आत न सोडणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री वैद्यनाथेश्वर मंदिरात गेल्यावर त्यांना सूक्ष्मातून अवतीभोवती सहस्रो नागांचे दर्शन झाले. विश्वस्तांनी सांगितले, ‘‘मंदिराच्या जवळच भूमीखाली शिवलिंग (‘हालु रामेश्वर’) आहे. तेथील एक दैवी नाग अधूनमधून श्री वैद्यनाथेश्वराच्या दर्शनाला येतो. मंदिरात शौच-अशौच न पाळल्याने काही चूक घडली असेल, तर तो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन बसतो आणि कुणालाही आत सोडत नाही.’’
– श्री. विनायक शानभाग, बेंगळुरू, कर्नाटक. (२६.७.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |