छत्तीसगड येथे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी
‘तणावमुक्त जीवनासाठी साधना अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान
नागपूर – जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्या अर्थाने आनंदी जीवन जगता येऊ शकते. येणार्या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगड येथील हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी आयोजित केलेल्या ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ ४०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश श्री. हेमंत कानस्कर यांनी सांगितला.