श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !

Article also available in :

हिमाचल प्रदेशमधील कुल्लु जिल्ह्यातील ‘मणिकर्ण तप्तकुंड’ या स्थानाला भेट दिली. या दैवी प्रवासाचा वृत्तांत येथे दिला आहे.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

 

१. देवतांचे निवासस्थान असलेले कुलांतपीठ, म्हणजे देवभूमी हिमाचल येथील कुलु !

गरम पाण्याचे मणिकर्ण कुंड आणि तेथे असलेली शिवाची मूर्ती

देवभूमी हिमाचल प्रदेश येथे कुल्लु नावाचे नगर आहे. या नगराच्या चारही दिशांना अनेक दैवी स्थाने आहेत. ‘कुल्लु’ म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ !’ जेथे मनुष्यकुळ संपते आणि देवकुळ चालू होते, म्हणजेच जे देवतांचे निवासस्थान आहे, ते म्हणजे ‘कुलांतपीठ !’ अशा कुलु प्रदेशात ‘मणिकर्ण’ नावाचे स्थान आहे.

 

२. देवी पार्वतीच्या कर्णभूषणातील मणी पडलेले स्थान, म्हणजे मणिकर्ण येथील ‘तप्तकुंड’ !

पार्वती नदीला नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ अ. मणिकर्ण स्थानाचा इतिहास

शिव आणि पार्वती या ठिकाणी आले असतांना त्यांनी येथे काही काळ रहायचे ठरवले. पार्वती नदीच्या काठी शिवाने ११ सहस्र वर्षे तपश्चर्या केली. एक दिवस पार्वतीमाता या नदीमध्ये जलक्रीडा करत असतांना तिच्या कर्णभूषणातील मणी पाण्यात पडला. शिवाने तो मणी शोधण्यासाठी शिवगणांना आदेश दिला; मात्र पुष्कळ शोधूनही तो मणी सापडला नाही. तेव्हा शिव क्रोधित झाला आणि त्याने तिसरा डोळा उघडला. त्यातून नैनादेवी प्रगट झाली. तिने सांगितले, ‘‘देवी पार्वतीच्या कर्णभूषणातील मणी शेषनाग पाताळलोकात घेऊन गेला आहे.’’ तेव्हा ‘आता मणी देण्याविना पर्याय नाही’, हे शेषनागाच्या लक्षात आले. त्याने पाताळातून तोंडाने फुंकर मारली. त्याच्या फुंकरीतून पृथ्वीवर गरम पाण्याचे कुंड निर्माण झाले आणि तो मणी वर आला. या स्थानी देवीच्या कर्णभूषणातील मणी पडल्यामुळे या स्थानाला ‘मणिकर्ण’ असे नाव पडले. येथे अनेक ठिकाणी गरम पाण्याची तप्त कुंडे आहेत.

मणिकर्ण कुंडाला नमस्कार करतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ आ. येथील वैशिष्ट्य म्हणजे मणिकर्ण येथे घराघरांत भूमीतूनच गरम पाणी येते. त्यामुळे येथे कुणाच्याही घरात अंघोळीसाठी पाणी तापवायचे साधन नाही.

– श्री. विनायक शानभाग, कुल्लु, हिमाचल प्रदेश.

क्षणचित्रे

श्री. विनायक शानभाग

१. मणिकर्ण कुंडाकडे जातांना २०० मीटर आधी श्रीरामाचे एक प्राचीन मंदिर आहे. असे म्हटले जाते की, येथील श्रीरामाची मूर्ती कुल्लु नरेश विश्वनाथ महाराज यांनी अयोध्येतून आणली होती. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या मंदिरात जाऊन श्रीरामाकडे ‘रामराज्याची स्थापना (हिंदु राष्ट्राची स्थापना) लवकरात लवकर होऊ दे’, अशी प्रार्थना केली.

२. ‘मणिकर्ण कुंडातील पाण्याने सांधेदुखीसारख्या व्याधी बर्‍या होतात’, अशी अनेक जणांना अनुभूती आली आहे.

– श्री. विनायक शानभाग, कुल्लु, हिमाचल प्रदेश.
सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी आतापर्यंत अनुमाने ८ लाखांहून अधिक कि.मी. प्रवास करून अशा प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. त्यामुळे आपल्याला इतिहासाच्या पोटात दडलेल्या दैवी स्मृतींचे छायाचित्रमय दर्शन घडत आहे ! त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

1 thought on “श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !”

  1. हा प्रवास आणि अनुभव सादर करण्याचे पूण्य कर्म करण्याची अनुभूती होणे आणि हे एक मोठे कार्य करण्याची शक्ती प्रदान होणे, ही परमेश्वराची कृपाद्रुष्टी आपल्या वर असल्याचे द्योतक आहे.

    Reply

Leave a Comment