कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळी या सणाविषयी पुढील लेखातून जाणून घेऊया.
१. तिथी
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा
२. महत्त्व
कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचीही वर्षातून एखाद्या दिवशी पूजा होऊन त्यांना नैवेद्य अर्पण होणे आवश्यक असते. ते या दिवशी केले जाते.
३. पूजन
आपले कुलदैवत आणि इष्टदेवता यांच्याबरोबरच स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता अन् गावातील अन्य मुख्य आणि उपदेवता यांचे, तसेच महापुरुष, वेतोबा इत्यादी निम्नस्तरीय देवता यांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य या दिवशी पार पाडले जाते. देवदिवाळीला पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविला जातो.