लहान मुला-मुलींच्या गळ्यात धागा बांधून त्याला छातीच्या पातळीवर येईल आणि शरिराला स्पर्श होईल, अशा प्रकारे वेखंडाचा तुकडा नीट घट्ट बांधून ठेवावा.
» त्याचा आकार तोंडात सहजासहजी जाऊ नये इतका असावा.
» त्या तुकड्याला बुरशी तर लागत नाही ना, याकडे मध्ये मध्ये लक्ष द्यावे.
» हा तुकडा ठराविक दिवसांनी नियमितपणे पालटावा.
छाती हे कफाचे प्रमुख स्थान आहे. वेखंडासारख्या वनस्पती स्पर्शानेही काम करू शकत असल्याने आयुर्वेदात याला ‘औषधीधारण’ असे म्हटले आहे.