सनातन कार्य

१. अध्यात्मप्रसार

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

 

२. धर्मजागृती

धर्मरक्षणासाठी कृती करणे, हे धर्मपालनच आहे !

`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही. समाजाची धर्माबद्दलची उदासीनता दूर करण्यासाठी, धर्माचा बुरखा पांघरून समाजात शिरलेल्या दुष्प्रवृत्ती रोखण्यासाठी, तसेच समाजाला खरा धर्म समजावून सांगण्यासाठी सनातन कार्यप्रवण झाले आहे.

 

३. समाजसाहाय्य

समाजसाहाय्य यांविषयी ‘सनातन संस्था’ पुढीलप्रमाणे विविध उपक्रम राबवते.

अ. व्यावसायिक प्रशिक्षण

आ. आरोग्य संवर्धनासाठी कार्य

इ. शैक्षणिक उपक्रम

ई. दारिद्र्य निर्मूलन उपक्रम

 

४. राष्ट्ररक्षण

राष्ट्ररक्षण यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. उदा. राष्ट्रीय अस्मितांचे रक्षण, संस्कृतीचे संवर्धन, पर्यावरण संतुलन उपक्रम, वृक्षारोपण, शिक्षणक्षेत्रातील अपप्रकारांविरुद्ध चळवळ, विनामूल्य प्रथमोपचार अन् आपत्कालीन प्रशिक्षणवर्ग, समाजहितकारी संस्थांसमवेत कार्य इत्यादी.

सनातन संस्थेच्या कार्याच्या विविध पैलुंविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंक पहा, ‘कार्य’.

Leave a Comment