हिंदुद्वेषाने पछाडलेल्या पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांचा थयथयाट !
- सप्टेंबर २०२० मध्ये सनातन संस्थेच्या फेसबूक पानावर अन्याय्य बंदी लादल्यानंतर सनातन संस्थेने सोदाहरण स्पष्ट केले की, झाकीर नाईक, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आदी जिहादी विचारसरणी ओकत असलेल्या फेसबूक पानांवर फेसबूककडून बंदी का घालण्यात आली नाही ? असे असले, तरी फेसबूकने आजतागायत तशी कारवाई केलेली दिसत नाही. यातून फेसबूकचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा आणि ‘हम करे सो कायदा’ ही एकाधिकारशाही वृत्ती स्पष्ट होते.
- यातून जागतिक स्तरावरील शक्ती कशाप्रकारे हिंदूंच्या विरोधात हातात हात घालून हिंदुद्वेष्टा अजेंडा पुढे रेटतात, हे सोदाहरण स्पष्ट होते. त्यामुळेच असे साम्यवादी, कथित धर्मनिरपेक्षतावादी, समाजवादी, उदारमतवादी आणि त्यांचे भारतातील हस्तक यांच्या विरोधात हिंदूंनीही विविध स्तरांवर एकत्र येऊन वैध मार्गाने जागतिक लढा उभारणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे जाणा !
मुंबई – सप्टेंबर २०२० मध्ये फेसबूकने सनातन संस्थेच्या फेसबूक पानावर बंदी लादल्यानंतरही संस्थेशी निगडित असलेल्या अन्य संघटनांची फेसबूक पाने बिनदिक्कतपणे चालू होती. त्या माध्यमांतून मुसलमानांच्या विरोधात गरळओक केली जात होती. या पानांचे २७ लाखांहून अधिक अनुयायी (फॉलोअर्स) होते. एप्रिल २०२१ मध्ये फेसबूकला यासंदर्भात आम्ही लक्षात आणून दिल्यावरच त्याने हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात, सनातन शॉप, तसेच समितीची अन्य पाने अशा ३० हून अधिक पानांवर बंदी लादली, असा थयथयाट ‘टाइम’ या अमेरिकेतील नियतकालिकाने केला आहे. ९ जून या दिवशी यासंदर्भात टाइमच्या बिली पेरिगो या पत्रकाराचा हिंदुद्वेषी नि पूर्वग्रहदूषित लेख प्रसिद्ध झाला आहे. याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
Today's Daily Spotlight, from @billyperrigo:
Facebook allowed a Hindu extremist group to operate openly on its platform for months, even after the company banned the group’s main pages for violating its policies https://t.co/PgwjGYDUUx
— TIME (@TIME) June 11, 2021
पेरिगो लेखात पुढे लिहितात, ‘‘या पानांवरून नियमितपणे मुसलमानांविरोधात द्वेष पसरवणारे आणि खोटी माहिती देणारे लिखाण प्रसृत करण्यात येत होते. त्यात मुसलमानांना हिरव्या रंगातील रेखाचित्राद्वारे दर्शवले जात होते. तसेच या पानांवरून ‘लव्ह जिहाद’ या कपोलकल्पित संकल्पनेचा दुष्प्रचार करण्यात येत होतो.’’ (‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. उच्च न्यायालयानेही त्याच्या अस्तित्वाविषयी वक्तव्य केलेले आहे. आज भारतातील अनेक राज्य सरकारांनी लव्ह जिहादविरोधी कायदेही केले आहेत. त्यावर ‘टाइम’चे पत्रकार महाशय चकार काढत नाहीत. यातून आपल्याला हवी असलेली विचारसरणी मग ती कितीही वस्तूस्थितीला धरून नसली, तरी आपल्याला सोयीची उदाहरणे देऊन कशी रेटायची, हेच स्पष्ट होते. यासाठी पेरिगो यांना पुरस्कारच द्यायला हवा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात )
लेखातील अन्य काही सूत्रे पुढीलप्रमाणे –
१. ३२ कोटी भारतीय हे फेसबूकचे वापरकर्ते असल्याने शक्यतो फेसबूक हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर कारवाई करत नाही. तसेच सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधातील ‘पोस्ट’ काढल्या जात नाहीत. हिंदुत्वनिष्ठांच्या आक्षेपार्ह पोस्टवर फेसबूक कारवाई करत नाही. (असे आहे, तर आजपर्यंत फेसबूकने एवढ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची फेसबूक पाने का बंद केली ? – संपादक दैनिक सनातन प्रभात )
२. फेसबूककडे जगभरातील शेकडो धोकादायक संघटनांची सूची असते; परंतु ते ही सूची कधीच जगासमोर आणत नाहीत. फेसबूकने एखाद्या संघटनेच्या फेसबूक पानावर बंदी लादली, तर त्या संघटनेचे कौतुक किंवा समर्थन आदी करणार्या पोस्ट्सवरही नियंत्रण आणले जाते.
३. पत्रकार पेरिगो लेखात ‘फेसबूकने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धोकादायक संघटनांच्या सूचीत घातले आहे का ?’, असेही विचारले असल्याचे नमूद करतात. (यातून पेरिगो यांचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधातील द्वेषच स्पष्ट होतो. – संपादक दैनिक सनातन प्रभात )
४. लेखात शेवटी एका हिंदुद्वेष्ट्या पत्रकाराचा हवाला देत पेरिगो लिहितात, ‘‘ट्विटर, टेलीग्राम आणि यू ट्यूब यांसारख्या सामाजिक माध्यमांवरही सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची खाती आहेत. या सामाजिक माध्यमांनी या खात्यांवरही बंदी लादण्याचा विचार करायला हवा.’’
सनातन संस्थेने मांडलेली भूमिकेकडे ‘टाइम’कडून दुर्लक्ष !
‘टाइम’च्या लेखात पुरोगामी, हिंदुद्वेष्टे आदींनी सनातन संस्थेच्या विरोधात केलेल्या निराधार आरोपांचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे. सनातन संस्थेला काही आठवड्यांपूर्वी ‘टाइम’कडून प्रश्न पाठवण्यात आले होते. उत्तरात सनातन संस्थेने स्वत:ची भूमिका विस्तृतपणे मांडलीही होती; परंतु ‘टाइम’ने त्याकडे दुर्लक्ष करून जुजबी भूमिका छापली, असे खेदाने म्हणावे लागेल. या लेखात अत्यंत त्रोटक स्वरूपात सनातनची भूमिका मांडण्यात आलेली दिसते, असे सनातन संस्थेच्या प्रवक्त्याने कळवले आहे.
हिंदू आणि भारतद्वेष्ट्या ‘फेसबूक’ वर
भारतात बंदी घाला !– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
‘टाइम’च्या सांगण्यावरून फेसबूक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पाने बंद करते, या उदाहरणातून पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आणि ‘सोशल मीडिया जायंट्स’ (मोठमोठी सामाजिक प्रसारमाध्यमे) यांच्या हिंदुद्वेषी युतीचे भयावह चित्र स्पष्ट होते. या युतीमागे कोणत्या शक्ती आहेत, हे पडताळून पहाण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये धर्मप्रसाराचे स्वातंत्र्य असतांना अशाप्रकारे फेसबूककडून कारवाई करण्यात येणे म्हणजे राज्यघटना प्रदत्त भारतियांच्या मूलभूत अधिकारांचे हनन आहे. त्यामुळे फेसबूकसारख्या भारतविरोधी आणि हिंदुद्वेषी सामाजिक माध्यमांवर भारतात बंदीच घालायला हवी.’
‘फेसबुक का हिन्दूद्वेष !’ या विषयावर विशेष संवादाचे आयोजन !
फेसबूकने सनातन प्रभात नियतकालिके आणि ‘सनातन शॉप’ यांच्यासमवेतच हिंदु जनजागृती समितीची अधिकृत पाने आणि ३५ राज्य अथवा जिल्हास्तरीय पाने यांच्यावर अन्याय्य बंदी लादली आहे. या पार्श्वभूमीवर फेसबूकचा हिंदुद्वेषी चेहरा उघड करून व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या अंतर्गत विशेष संवादाचे आयोजन १२ जून २०२१ या दिवशी करण्यात आले होते.