विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.
विवाहानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी करावयाच्या कृती
१. राष्ट्र अन् धर्म विषयक प्रवचनाचे आयोजन करा. २. धर्माचरणाचे (उदा. ‘शास्त्रानुसार नमस्कार कसा करावा’, ‘हिंदु धर्मशास्त्रानुसार वाढदिवस कसा साजरा करावा’ इत्यादी) महत्त्व सांगणार्या ध्वनीचित्र-चकत्या (व्हिडीओ सीडी) दाखवा.
विवाहस्थळी करण्यासारख्या कृती
१. विवाहसोहळ्याच्या ठिकाणी धार्मिक सुवचनांचे फलक, तसेच ‘साधना’ / ‘विवाह’ या विषयांवरील ‘धर्मशिक्षण फलक’ लावणे.
२. हिंदूंचे प्रबोधन करण्यासाठी हिंदूंवर होणार्या अत्याचारांचे प्रदर्शन आयोजित करणे. ३. ‘धर्म’ / ‘अध्यात्म’ या विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आयोजित करणे. ४. ठराविक कालावधीने ध्वनीवर्धकावरून विवाहसोहळ्यातील विधींचे महत्त्व सांगणे. ५. विवाहासाठी आलेल्या पाहुण्यांना धर्माचरणाविषयीचा लघुग्रंथ / ग्रंथ भेट म्हणून देणे. ६. विवाह लागल्यानंतर ‘राष्ट्र अन् धर्म यांची दुःस्थिती पालटण्यासाठी काय करावे ?’ किंवा ‘ईश्वरप्राप्तीसाठी करावयाची साधना’ यांसंबंधी उपस्थितांना १० मिनिटे मार्गदर्शन करणे. ७. राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यासाठी धन संग्रहित व्हावे, यासाठी ‘अर्पण कलश’ ठेवणे.
विवाहसोहळ्यात धर्मप्रसार करण्यासाठी
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती विनामूल्य साहाय्य करील ! विवाहसोहळ्यात धर्मप्रसार करण्यास आपण इच्छुक असाल, तर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आपणाला खालीलप्रमाणे साहाय्य करतील.
१. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी १.३० घंट्यांचे (तासांचे) किंवा विवाह लागल्यानंतर उपस्थितांसाठी १० मिनिटांचे मार्गदर्शन आयोजित केल्यास वक्ते किंवा मार्गदर्शनाची संहिता पुरवणे.
२. विवाहसोहळा चालू असतांना विवाहविधींचे महत्त्व सांगणारी संहिता पुरवणे.
३. काश्मिरी आणि बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचाराविषयी हिंदूंचे प्रबोधन करणारे चित्र-प्रदर्शन, तसेच देवता, धार्मिक कृती, आचारधर्म आदी विषयांचे धर्मशिक्षण फलक, तसेच धार्मिक सुवचनांचे फलक लावणे.
धर्मप्रसार होण्यासाठी उपयुक्त होईल, असा अहेर करावा !
विवाहाच्या निमित्ताने आपण नातेवाइकांना अहेर देतो. अहेर स्वीकारणार्या व्यक्तीला (संस्कार्य व्यक्तीला) ईश्वराचे एक रूप मानून तिच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा अहेर द्यावा. ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे, देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्या आदी योग्य अहेराची उदाहरणे आहेत. सनातन-निर्मित ग्रंथ / लघुग्रंथ, देवतांची सात्त्विक चित्रे आणि सात्त्विक उत्पादने अहेर देण्यासाठी उपयुक्त आहेत. आपण निवडलेले ग्रंथ, देवतांची चित्रे आणि सात्त्विक उत्पादने यांचे आकर्षक बांधणीसह (पॅकिंगसह) भेटसंच उपलब्ध आहेत.
विवाहसोहळ्याच्या माध्यमातून धर्मप्रसार करण्यास आपण इच्छुक असल्यास खालील ठिकाणी संपर्क करा –
सनातन ग्राहक सेवाकेंद्र पत्ता : १०७, सनातन आश्रम, पोष्ट : ओएन्जीसी, देवद, ता. : पनवेल, जिल्हा : रायगड, ४१०२२१ दू.क्र. : ०९३२२३१५३१७, ०२१४३ (२३३१२०)