सनातनची आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व

‘वेद, उपनिषदे, पुराणे आदी धर्मग्रंथ गेली सहस्रो वर्षे मार्गदर्शन करत आहेत, तसेच सनातनचे ग्रंथ पुढे सहस्रो वर्षे मानवजातीला मार्गदर्शन करतील’, असा आशीर्वाद एका संतांनी दिला आहे.

पू. संदीप आळशी

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांपैकी मे २०२१ पर्यंत केवळ ३३८ हून अधिक ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली असून अन्य सुमारे ५ सहस्रांहून अधिक आध्यात्मिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता. या सेवेची थोडीफार कल्पना यावी, यासाठी ग्रंथांचे विषय पुढे दिले आहेत.

१. धर्म, अध्यात्म, धर्माचरण, देवतांची उपासना आणि साधना

२. साधक, शिष्य, संत, गुरु आणि आध्यात्मिक उन्नती

३. ईश्‍वरप्राप्तीसाठी कला आणि विद्या (ज्योतिषशास्त्र इत्यादी)

४. वाईट शक्तींचे त्रास आणि आध्यात्मिक उपाय

५. स्वभावदोष-निर्मूलन आणि संमोहन उपचार

६. बालसंस्कार, कुटुंबव्यवस्था आणि आदर्श समाजरचना

७. राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना

८. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि देवभाषा यांचे महत्त्व अन् रक्षण

९. आपत्काळातील जीवितरक्षणाचे उपाय आणि स्वरक्षणाच्या कला

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य, वैशिष्ट्ये, शिकवण, देहातील दैवी पालट आदी विषय

ग्रंथांची सविस्तर सूची  दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आणि ‘सनातन प्रभात’ची अन्य नियतकालिके यांत प्रकाशित करण्यात येईल.

ग्रंथ-निर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २-३ आठवडे रहाता येईल. पुढे आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील. या सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून स्वत:ची माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे sankalak.goa@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.

– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment