
एखाद्या कुटुंबातील पाच सदस्यांनी आध्यात्मिक स्तरावरील लिखाण करून ते ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करण्याचे उदाहरण सध्याच्या काळात वैशिष्ट्यपूर्णच ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे. त्यातील काही लिखाण ग्रंथस्वरूपात प्रकाशित झाले आहे, तर काही लिखाण प्रकाशित होणे बाकी आहे.