नामजप हा केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक नसून तो विविध विकारांच्या निर्मूलनासाठीही लाभकारक ठरतो, हे सिद्ध झालेले आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी योगासने, प्राणायम, आयुर्वेदाचे उपचार इत्यादी प्रयत्न समाजातून होत आहेत. त्याबरोबर रोगप्रतिकारक शक्तीला पूरक असलेले आत्मबळ वाढण्यासाठी साधनाच करावी लागते.
कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांमध्ये साधनेचे आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी म्हणजेच कोरोना विषाणूंचा प्रभाव स्वतःवर न होण्यासाठी किंवा झाला असल्यास तो नष्ट करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने देवी, दत्त आणि शिव ही तत्त्वे आवश्यक आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः- श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करावा.
हा नामजप १०८ वेळा (१ माळ) करायला ४० मिनिटे लागतात. ‘कोरोना विषाणूंचा प्रभाव जगभर असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी हा नामजप प्रतिदिन १ माळ करावा. काहींना कोरोना विषाणूंची लागण झाल्याची काही लक्षणे दिसल्यास आध्यात्मिक बळ अधिक प्रमाणात वाढावे, यासाठी त्यांनी हा नामजप प्रतिदिन ३ घंटे (६ माळा) करावा.
सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, ‘सनातन प्रभात’चे वाचक हा नामजप मागील एक वर्षभर नियमित करत आहेत. त्यांना नामजपामुळे आत्मबळ वाढत असल्याची अनुभूती येत आहे.
नामजपातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा आणि आत्मबळ वाढण्यासाठी होणारा आध्यात्मिक लाभ लक्षात घेता ३१ मे २०२१ पर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ११२, सातारा येथे ४२, सोलापूर ४२, कोल्हापूर ४१, सांगली ३२ आणि गोवा ११ अशा एकूण २७९ ठिकाणी हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावण्यात येत आहे. या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, रुग्णालये, चिकित्सालये, औषधालये (मेडिकल स्टोअर्स), लॅब आदी ठिकाणी, तसेच महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील काही मंदिरांमध्येही हा नामजप लावण्यात येत आहे.
सश्रद्ध समाजाला आवाहन !
वैद्यकीय उपचारांसह आध्यात्मिक साधना केल्यास समाजाला लाभ होऊ शकतो, यासाठी भारतातील सश्रद्ध समाजाने कोरोना महामारीच्या या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्रीदुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करावा. तसेच आपले घर, कार्यालय, दुकाने, रुग्णालये, चिकित्सालये, कोविड केअर सेंटर, औषधालये, मंदिरे येथे हा नामजप ध्वनीक्षेपकावर लावून आध्यात्मिक सेवेत सहभाग नोंदवावा, ही विनंती.
हा नामजप सनातन संस्थेने ध्वनीमुद्रित केलेला असून तो आपणांस संपर्कातील सनातनच्या साधकांकडून प्राप्त केला जाऊ शकतो, तसेच हा नामजप ‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपवरही उपलब्ध आहे. आपल्याला हा ध्वनीमुद्रित नामजप न मिळाल्यास पुढील पत्त्यावर अथवा भ्रमणभाषवर संपर्क करावा.
देवतांचे सर्व नामजप, स्ताेत्र, आरती इ. विनामूल्य ऐकण्यासाठी ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ॲप ‘गूगल प्ले स्टोअर’च्या पुढील मार्गिकेवरून डाउनलोड करावे. www.sanatan.org/Chaitanyavani
टपालाचा पत्ता – सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१
भ्रमणभाष क्र. – ७०५८८८५६१०
तसेच ध्वनीक्षेपकावर वरील नामजप लावण्याच्या संदर्भातील उपक्रम चालू असल्यास त्याची माहिती आपल्या संपर्कातील सनातनचे साधक किंवा सौ. भाग्यश्री सावंत यांना द्यावी.