मनोविकारांवर वैद्यकीय उपचारांसह नामजप करणे हा प्रभावी उपाय आहे. जीवनातील बहुतांशी समस्यांचे मूळ हे आध्यात्मिक असते. हे जाणून साधना केल्यास गुणसंवर्धन होऊन जीवनातील आनंद अनुभवता येऊ शकतो. नामजपादी साधनेमुळे व्यक्तीमधील नकारात्मक स्पंदने न्यून होऊन तिच्यात सकारात्मक ऊर्जा वाढते. तिच्यावरील त्रासदायक आवरण दूर होते. त्यामुळे तिच्या मनात येणारे अनावश्यक विचार, नकारात्मक विचार न्यून होतात. त्याच्याच जोडीला जीवनाविषयी योग्य दृष्टीकोन देणार्या सकारात्मक सूचना मनाला दिल्या, तर मन ऐकते. त्या व्यक्तीच्या मनात सकारात्मक विचारांचे तसेच योग्य दृष्टीकोनांचे केंद्र निर्माण होण्यास साहाय्य होऊन नैराश्य, ताण, अपेक्षा आदी दोष अल्प होऊन जीवन संपवण्यासारखे टोकाचे निर्णय घेण्यापासून परावृत्त होता येते. मन आनंदी आणि उत्साही होते. स्वयंसूचना विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने दिली जाते, तरी त्यामुळे दोष न्यून व्हायला साहाय्य होते. जी स्वयंसूचना घेणार ती घेणार्या व्यक्तीच्या मनाला पटलेली असायला हवी, तर मन ती स्वीकारते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.
दोषांनुसार सूचनांची काही उदाहरणे येथे देत आहोत.
१. पिकांची हानी झाल्याने शेतकर्याला निराशा येणे
सूचना : पिकांची हानी झाली असली, तरी जीवनात चढउतार हे येतच असतात, त्यामुळे ही स्थिती पालटेल हे लक्षात येईल आणि आताच्या स्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधीन.
२. अपेक्षित गुण न मिळाल्याने हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याने निराशा येणे
सूचना : … टक्के अपेक्षित गुण मिळाले नाहीत, तरी पुढील काळात अपेक्षित गुण मिळू शकतात, हे लक्षात घेईन आणि अन्य विषय अन् महाविद्यालये यांविषयी अभ्यास करून कुठे प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेईन.
३. पतीसमवेत भांडणे होत असल्याने निराशा येणे
सूचना : पतीसमवेत भांडण झाल्यावर निराशा येईल, तेव्हा मी त्यांना मला समजून घ्यायचे आहे, हे लक्षात येईल आणि आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन.