साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
आपत्काळ ५-६ वर्षांचा असल्यामुळे आतापासूनच पाण्याचीही साठवणूक करून ठेवावी लागणार आहे. यादृष्टीने खालील माहिती आवश्यक आहे.
१. पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोठ्या टाक्या बांधणे किंवा खरेदी करणे, हे खर्चिक होऊ शकते. त्या दृष्टीने ५-६ वर्षांसाठी पाण्याचा साठा करता येईल, अशा कमी खर्चाच्या पर्यायांची माहिती
२. अल्प आणि अधिक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी अल्प खर्चात पाण्याची साठवणूक कशी करावी.
३. पिण्याचे पाणी आणि दैनंदिन उपयोगाचे पाणी यांची वेगवेगळी साठवणूक करण्याच्या पद्धती
४. वापरलेले पाणी पुनर्प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणण्याच्या अल्प खर्चातील पद्धती
या संदर्भातील माहिती उपलब्ध असल्यास किंवा अशी माहिती कुठे उपलब्ध होऊ शकते, हे माहीत असल्यास ते खालील पत्त्यावर कळवावे.
सौ. भाग्यश्री सावंत : भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१०,
संगणकीय पत्ता : [email protected]
पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ’सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१