गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – काळ्या आणि पांढर्या बुरशीनंतर आता देशात पिवळ्या बुरशीचा रुग्ण सापडला आहे. पिवळी बुरशी अधिक धोकादायक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. गाझियाबाद येथे सापडलेल्या पिवळ्या बुरशीच्या रुग्णावर सध्या उपचार चालू आहेत.
#BREAKING | After black and white fungus, yellow fungus infection cases reported in India – Know why it is more dangerous
Read here- https://t.co/SH5Ao0vt1i#BlackFungus #WhiteFungus #yellowFungus #COVID19India #CoronavirusIndia pic.twitter.com/s6KEV83pdm
— DNA (@dna) May 24, 2021
१. पिवळ्या बुरशीच्या संसर्गामध्ये भूक अल्प लागणे किंवा न लागणे, वजन न्यून होणे, सुस्ती येणे, कुपोषण, अवयव निकामी होणे, डोळे येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे.
२. पिवळी बुरशी होण्यामागे अस्वच्छता हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. शिळे अन्न खाऊ नये. घरातील दमटपणाही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अधिक दमट वातावणामुळे बुरशी होण्याचे संकटही वाढते. उपचार म्हणून अॅम्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन दिले जात आहे.