कोची (केरळ) – हनुमान जयंतीच्या पावन दिवशी मल्याळम् भाषेत ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप घेण्यात आला. याला अनेक भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हनुमानाच्या विषयीचे प्रवचन कु. रश्मि परमेश्वरन् यांनी घेतले. प्रवचनात हनुमानाविषयीची शास्त्रीय माहिती आणि एक सूक्ष्म प्रयोग घेण्यात आला. प्रवचन आणि सूक्ष्म प्रयोग यांविषयी भाविकांनी ‘खूप आवडले’ असे, तर नामजपामुळे अनेकांचे मन शांत झाल्याचे जाणवले.
जिज्ञासूंचे अभिप्राय
• श्री. अखिल आणि श्री. प्रकाश प्रभु – नामजप झाल्यावर खूप शांत वाटले.
• सौ. सुनीता – भावपूर्ण जप करता आला आणि आनंद वाटला.
• सौ. सबिता – नामजप संपला, तरी तो आणखी करूया, असे वाटत होते.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.