सातारा – कोयना नगर येथील कोयना धरण परिसराला भूकंपाचे २ सौम्य धक्के बसले. ८ मे या दिवशी दुपारी १.५५ वाजता पहिला धक्का, तर १.५८ वाजता दुसरा धक्का बसला. भूकंपमापन केंद्रावर भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल आणि ३ रिश्टर स्केल ऐवढी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदु वारणा खोर्यात जावळे गावापासून वायव्येला ८ किलोमीटर अंतरावर होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात