लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. अनेक पानांच्या, सुगंधी, महागड्या अशा लग्नपत्रिका छापण्याकडे समाजाचा कल वाढला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत. या दृष्टीने लग्नपत्रिकेतील विविध घटक कसे असावेत, याचे विवेचन पुढे केले आहे.
लग्नपत्रिका सात्त्विक होण्यासाठी काय करावे ?
१. सात्त्विक चित्रे आणि कलाकुसर (नक्षी)
अ. लग्नपत्रिकेत देवतांची विडंबनात्मक चित्रे (उदा. श्री गणेशाचे केवळ मुख असलेले, पानात रेखाटलेले, फेटा बांधलेले आदी) छापू नका. देवतांच्या सात्त्विक चित्रांचा (उदा. मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली पूर्णाकृती श्री गणेशमूर्ती) उपयोग करा.
आ. पत्रिकेत लिखाणाची संरचना करतांना शुभचिन्हांचा (उदा. स्वस्तिक, ॐ, कलश, गोपद्म, कमळ) वापर करा !
सात्त्विक लग्नपत्रिकेचा नमुना
पाकीटाच्या मागील बाजूचा नमुना
पाकीटाच्या पुढील बाजूचा नमुना
२. लिखाण
अ. लग्नपत्रिकेतील लिखाण मातृभाषेत प्रसिद्ध करा. मातृभाषेतील लिखाण सर्वच आप्तस्वकीयांना समजणारे नसल्यास ते राष्ट्रीय भाषेतून प्रसिद्ध करा; मात्र ते इंग्रजीतून प्रसिद्ध करू नका.
आ. लग्नपत्रिकेतील लिखाणाचे व्याकरण शुद्ध असावे, तसेच लिखाणात परकीय भाषांतील शब्दांचा वापरही टाळावा.
इ. अक्षरांचा आकार गोलाकार आणि अक्षरे उठून दिसतील इतका ठळक असावा; मात्र अक्षरे बटबटीत करू नयेत. तसेच अक्षरे तिरपी करू नयेत.
ई. निमंत्रणाचा मजकूर साधा; पण गुरु आणि ईश्वर यांच्याप्रती भाव व्यक्त करणारा असावा, उदा. ‘आमचे कुलदैवत श्री भवानीदेवीच्या कृपेने ….’, ‘श्री गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेने…’, अशा प्रकारे निमंत्रणाचा आरंभ असावा.
३. लग्नपत्रिकेवर छापण्यासाठी काही सुवचने
अ. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
आ. बांधूनी लग्नाच्या बंधनगाठी ।
चालू जेव्हा आम्ही सप्तपदी ।
असावा एकच भाव गुरूंच्या प्रती ।
प्रत्येक पाऊल असावे गुरुकार्यासाठी ।।
इ. हिंदूंनो, विवाह हा ‘सामाजिक सोहळा नसून ‘धार्मिक विधी’ आहे, हे जाणा !
ई. धर्मसूर्यापुढे नतमस्तक होऊनी, चालूया संसाराची वाट ।
राष्ट्र-धर्म कार्याचे व्रत घेऊनी, पाहूया ‘हिंदु राष्ट्रा’ची पहाट ।।
उ. ‘जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (ईश्वर) करतो.’ – महाभारत ३.३१३.१२८
ऊ. गुरुकृपेने नाते जुळले पती-पत्नीचे ।
धर्मकार्य वाढवण्या आशीर्वाद असावेत श्री गुरूंचे ।।
ए. नाम घेता मुखी त्यांचे ।
ओढी गाडे संसाराचे ।। – प.पू. भक्तराज महाराज
४. लग्नपत्रिकेवर छापण्यासाठी राष्ट्र अन् धर्म विषयक लिखाण
अ. आचारधर्माचे पालन करा अन् जीवन आनंदी बनवा !
१. पुरुषांनी भ्रूमध्यावर उभा टिळा लावावा आणि स्त्रियांनी अनामिकेने (करंगळी जवळच्या बोटाने) गोल कुंकू लावावे.
२. अन्न ग्रहण करण्यापूर्वी देवाला प्रार्थना करावी.
३. सायंकाळी देवापुढे दिवा लावावा अन् वास्तूमध्ये सर्वत्र धूप दाखवावा वा उदबत्ती फिरवावी.
४. स्वतःभोवती देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करून अन् देवाला प्रार्थना करून पूर्व-पश्चिम दिशेत झोपावे.
(अधिक विवेचनासाठी वाचा – सनातनची ‘आचारधर्मविषयक ग्रंथमालिका’)
आ. हिंदु संस्कृतीनुसार आचरण हेच धर्माचरण !
१. विवाहसोहळा, पायाभरणी, दीपप्रज्वलन यांसारख्या प्रसंगी पादत्राणे घालू नका !
२. मंदिर आणि तेथील परिसर येथे चित्रपटगीते लावून किंवा धूम्रपान करून तेथील पावित्र्य नष्ट करू नका !
३. मौजमजा म्हणून नव्हे, तर भक्तीभावाने तीर्थस्थळांना भेट द्या !
४. ज्येष्ठांना नमस्कार करतांना डोके थोडे खाली झुकवून नम्रभावाने नमस्कार करा !
५. वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता नव्हे, तर सूर्योदय झाल्यानंतर द्या !
६. सत्कार करतांना पुष्पगुच्छ नव्हे, तर फूल द्या वा हार घाला !
७. उद्घाटन फीत कापून नव्हे, तर नारळ वाढवून करा !
८. दीपप्रज्वलन तमोगुणी मेणबत्तीने नव्हे, तर सात्त्विक तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) करा !
इ. हस्तांदोलन (शेक हॅण्ड) नको, नमस्कार करा !
१. पाश्चात्त्य संस्कृतीला विरोध करा ! स्वागत हस्तांदोलनाने करू नका !
हस्तांदोलनामुळे होणारे तोटे : हस्तांदोलनाच्या माध्यमातून लहान-मोठ्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होऊ शकतो. एकमेकांना वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो.
२. हिंदु संस्कृतीचे पालन करा ! स्वागत हात जोडून नमस्काराने करा !
नमस्कारामुळे होणारे लाभ : नमस्कार करतांना मनात समोरच्या व्यक्तीप्रती आदरभाव निर्माण होतो. नमस्काराच्या मुद्रेतून सात्त्विकता मिळते.
हिंदूंनो, पाश्चात्त्य संस्कृती तामसिक (त्रासदायक) आहे, तर हिंदु संस्कृती सात्त्विक आहे; म्हणून महान हिंदु संस्कृतीचा अभिमान बाळगा !
ई. पाश्चात्त्य संस्कृतीला भुलून महान हिंदु संस्कृतीला विसरू नका !
१. दिनांक लिहितांना ख्रिस्ती कालगणनेचा नव्हे, तर हिंदु कालगणनेचा वापर करा !
२. बोलतांना इंग्रजी भाषेचा नव्हे, तर मातृभाषेचा किंवा राष्ट्रभाषेचा वापर करा, उदा. आई-वडिलांना ‘मॉम-डॅड’ असे न म्हणता ‘आई-बाबा’ म्हणा !
३. शिष्टाचार (मॅनर्स) म्हणून अन्न ताटात टाकू नका, तर ‘अन्न हा देवाचा प्रसाद आहे’, असा भाव ठेवून ते सर्वच ग्रहण करा !
४. दिवेलागणीच्या वेळी मौजमजा म्हणून दूरचित्रवाणी पहाण्यात दंग होऊ नका, तर देवापुढे दिवा लावून आरती करा, तसेच श्लोकपठण आणि नामजप करा !
(शास्त्रीय विवेचनासाठी अवश्य वाचा : सनातनची ‘आचारधर्म’विषयक ग्रंथमालिका)
उ. धर्मशिक्षण घ्या, धर्माचरणी बना; जीवनाचे सार्थक करा !
१. घरात देवघर नसल्यास देवघर करून ते पूर्व-पश्चिम दिशेने ठेवा !
२. देवघरात श्री गणेशाची मूर्ती / चित्र मध्यभागी, तर श्री गणेशाच्या उजवीकडे पुरुषदेवता आणि डावीकडे स्त्रीदेवता यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा (चित्रे) ठेवा !
३. जीवन आनंदी बनावे, यासाठी कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) एक घंटा (तास) ते अधिकाधिक सतत करा !
४. गणपति, नवरात्र इत्यादी कुलाचार करत असल्यास त्यांचे नेमाने पालन करा !
५. आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून किमान एकदा तरी जा !
६. प्रतिदिन आपल्या परिसरातील देवळात जाऊन देवतेचे दर्शन घ्या !
७. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन दत्ताचा नामजप त्रासाच्या तीव्रतेनुसार न्यूनतम २ ते अधिकाधिक ६ घंटे (तास) करा !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’
ऊ. स्वत:ला ‘हिंदु’ म्हणवून घेत असाल, तर हे कराच !
१. धर्माचरण : प्रतिदिन टिळा लावा ! कुलाचार पाळा ! देवळे स्वच्छ ठेवा !
२. धर्मरक्षण : देवतांचे विडंबन करणार्या कार्यक्रमांवर बहिष्कार घाला !
३. धर्मबंधुत्वाची जोपासना : संकटकाळी हिंदूंना आर्थिक साहाय्य करा अन् आश्रय द्या !
४. संस्कृतीरक्षण : ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पाश्चात्त्य ‘डे’ प्रथांना विरोध करा ! जीन्स, टी-शर्ट, शेरवानी यांसारखी विदेशी वेशभूषा न करता हिंदु धर्मानुसार धोतर-सदरा, साडी यांसारखी वेशभूषा करा !
५. राष्ट्रप्रेमवृद्धी : राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारक यांचे स्मृतीदिन साजरे करा !
६. स्वभाषारक्षण : शक्यतो इंग्रजीत संभाषण टाळा ! स्वाक्षरी स्वभाषेत करा !
७. धर्मासाठी त्याग : धर्मकार्यासाठी प्रतिदिन १ घंटाभर (तासभर) तरी द्या आणि उत्पन्नाचा काही भाग नियमितपणे धर्मासाठी दान करा !
८. धर्माभिमान : ‘मी ‘हिंदु’ आहे, असे सांगण्यास लाजू नका !’ – स्वा. सावरकर
ए. हिंदूंनो, राष्ट्राभिमानी बनण्यासाठी हे करा अन् आपल्या पाल्यांकडूनही करवून घ्या !
१. देशभक्तीपर गीते / पोवाडे ऐका, तसेच क्रांतीकारकांची चरित्रे वाचा !
२. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांची जन्मस्थळे, स्मारके, तसेच ऐतिहासिक गड, जलदुर्ग आणि संग्रहालये यांना भेट द्या !
३. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा मान राखा !
४. क्रांतीकारकांची चरित्रे सांगणारी व्याख्याने, कथाकथन स्पर्धा, तसेच देशभक्तीपर चित्रपट यांचे आयोजन करा !
ऐ. प्रतिदिन राष्ट्र अन् धर्म यांसाठी १ घंटा (तास) तरी द्या !
१. चित्रे, नाटके, विज्ञापने (जाहिराती) इत्यादींतून होणारे देवतांचे विडंबन रोखा !
२. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत अन् राष्ट्रपुरुष यांचा होणारा अवमान रोखा !
३. जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचरण करा !
४. प्रतिदिन स्त्रियांनी गोल कुंकू आणि पुरुषांनी उभा टिळा लावा !
५. कुलाचारांचे पालन करा आणि प्रतिदिन कुलदेवतेचा नामजप करा !
६. राष्ट्राभिमानी आणि धर्माचरणी बनण्यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या धर्मशिक्षणवर्गांचा लाभ घ्या !
ओ. हिंदूंनो, हिंदुऐक्यच राष्ट्र एकसंध राखील !
१. शाळेचे संचालक किंवा प्राचार्य, अधिवक्ता (वकील), व्यापारी, उद्योजक यांसारख्या व्यक्तींनी आपल्या अधिकारक्षेत्रातील कृती करतांना प्राधान्याने हिंदुबांधवांचे हित जपावे.
२. कोणत्याही वस्तूची खरेदी, तसेच व्यवहार करतांना हिंदुहित जपण्याला प्राधान्य द्यावे.
३. देशात आणि जगात कोठेही हिंदूंवर अन्याय झाला, तर त्या हिंदूंना पाठिंबा दर्शवण्यासाठी तालुका किंवा जिल्हा पातळीवर निषेध सभा / आंदोलन / मोर्चा यांसारखी कृती करावी.
४. अन्यायग्रस्त हिंदूंना लवकरात लवकर न्याय देण्याची, तसेच त्यांच्या झालेल्या हानीची भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे करावी. अशा हिंदूंना न्यायालयीन लढ्यासाठीही साहाय्य करावे.
५. आपद्ग्रस्त किंवा दंगलग्रस्त हिंदूंना वस्तू वा आर्थिक स्वरूपात साहाय्य करावे.
औ. हिंदुसंघटनासाठी धर्मबंधुत्व जोपासा !
१. दंगल, पूर इत्यादी समयी निराश्रित झालेल्या हिंदूंना आर्थिक साहाय्य करा, तसेच आश्रय द्या !
२. धर्मांतराच्या विळख्यात अडकणार्या हिंदूंचे प्रबोधन करून त्यांना धर्मांतरापासून परावृत्त करा !
३. एका हिंदूवर अन्याय झाल्यास त्याला न्याय मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा !
४. आपल्या धर्मबांधवावर समाजकंटकांकडून आक्रमण झाल्यास त्याच्या संरक्षणासाठी पुढे या !
अं. हिंदुत्वाचा ध्वज उभारण्याचा संकल्प करूया !
१. धर्मशिक्षण घेऊन स्वतःमध्ये धर्मनिष्ठा जागवू !
२. व्यवहारात इंग्रजी भाषा नव्हे, तर मायबोली वापरू !
३. राष्ट्रपुरुषांचे बलिदान आठवून खरे राष्ट्रभक्त होऊ !
४. विदेशी कंपन्यांची नव्हे; स्वदेशी उत्पादने वापरू !
५. पाश्चात्त्य प्रथा नव्हे; हिंदु संस्कृती आचरू !
क. राष्ट्र आणि धर्म हित साधणार्या उमेदवारालाच मत द्या !
सद्यस्थितीत ‘हिंदूंची धर्मशक्ती मतांच्या माध्यमातून प्रकट होणे आवश्यक आहे’, असे संत सांगतात. हिंदूंनो, संतवचनानुसार तुमचे मत राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ उमेदवाराला देण्याचे कर्तव्य बजावा !
यांना मते देऊ नका !
१. भ्रष्टाचारी, गुंड आणि पक्षबदलू
२. मतांसाठी विविध प्रलोभने दाखवणारे
३. देशद्रोह्यांचे लांगूलचालन करणारे
४. हिंदु धर्मविरोधी कायदे करणारे आणि धर्म, देवता, संत आदींचा द्वेष करणारे
५. स्विस बँकेत पैसे लपवणारे आणि आतंकवादाचा भस्मासुर न रोखणारे
यांना मते द्या !
१. प्रामाणिकपणे कर भरणारे आणि नीतीमान
२. सर्व आश्वासनांची पूर्तता करणारे
३. हिंदुहिताच्या प्रश्नांना अग्रक्रम देणारे
४. हिंदु धर्म, देवता, संत आदींचे विडंबन होऊ नये, यासाठी दक्ष असणारे
५. स्वतःच्या आचरणातून जनतेला शिस्त, त्याग आणि राष्ट्राभिमान शिकवणारे उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याकडे न पहाता केवळ ‘हिंदुत्व’ आणि ‘राष्ट्रहित’ यांसाठी झटणार्या कर्महिंदूंनाच निवडून द्या !
ख. हिंदूंनो, स्वभाषा अन् स्वधर्म यांचा अभिमान बाळगा !
१. एकमेकांना भेटतांना पाश्चात्त्यांप्रमाणे हस्तांदोलन (शेकहॅण्ड) न करता हिंदु धर्मानुसार हात जोडून नमस्कार करा !
२. प्रतिदिन स्त्रियांनी टिकलीपेक्षा गोल कुंकू आणि पुरुषांनी कुंकवाचा उभा टिळा लावूनच घराबाहेर पडा !
३. हिंदु संस्कृतीनुसार पुरुषांनी सदरा-पायजमा / धोतर आणि स्त्रियांनी साडी असे सात्त्विक कपडे परिधान करा !
४. ज्येष्ठांना नमस्कार करतांना डोके थोडे खाली झुकवून नम्रभावाने नमस्कार करा !
५. दूरभाषवर / भ्रमणभाषवर `हॅलो’ न म्हणता `नमस्कार’ किंवा `जय श्रीराम’ म्हणा !
६. वाढदिवस पाश्चात्त्यांप्रमाणे केक कापून आणि मेणबत्त्या विझवून नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार जन्मतिथीला औक्षण करून साजरा करा !
७. दैनंदिन व्यवहार करतांना मराठी भाषेचा वापर करा, मराठी बोलतांना इंग्रजी शब्दांचा वापर टाळा आणि आपली स्वाक्षरी मराठीतच करा !
हिंदूंनो, लक्षावधी वर्षांच्या चैतन्यमय हिंदु संस्कृतीचे जतन कर्तव्यभावनेने करा !
ग. मराठीचा अभिमान बाळगा !
१. ‘हॅलो’ न म्हणता ‘नमस्कार’ म्हणा !
२. ‘शुभेच्छा’ आणि ‘अभिनंदन’ मराठी भाषेत करा !
३. ‘थँक्यू’ न म्हणता ‘धन्यवाद’ म्हणा !
४. स्वाक्षरी इंग्रजीत न करता मराठीत करा !
५. आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकवा !
(सविस्तर शास्त्रीय विवेचनासाठी वाचा – सनातनची ‘भाषाविषयक ग्रंथमालिका’ !)
घ. अहेर घेणे आणि देणे !
अहेर देतांना अन् घेतांना ठेवायचा दृष्टीकोन
१. व्यावहारिक वस्तूंचा अहेर दिल्याने अहेर स्वीकारणार्या व्यक्तीमध्ये आसक्ती निर्माण होते. याउलट ग्रंथ अन् ध्वनीचित्र-चकती (ऑडीओ सीडी) यांसारखे आध्यात्मिक अहेर दिल्याने व्यक्ती धर्माचरणास प्रवृत्त होते.
२. अहेर घेणार्याने ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी किंवा धनरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवावा.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’
च. विवाह आचारसंहिता
वधू-वराची वेशभूषा कशी असावी ?
१. वधू : नऊवारी साडी नेसावी. नऊवारी साडी नेसणे शक्य नसल्यास सहावारी साडी नेसावी. लाल, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी यांसारख्या सात्त्विक रंगांची सुती किंवा रेशमी साडी नेसावी.
२. वर : वराने कृत्रिम धाग्यांपासून शिवलेले शर्ट-पँट, कोट-टाय यांसारखे कपडे घालू नयेत, तर नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले सुती किंवा रेशमी सोवळे-उपरणे किंवा अंगरखा (सदरा)-पायजमा हे कपडे परिधान करावेत.
विवाहभोजन कसे असावे ?
१. अती तेलकट, तिखट, मसालेदार अशा तामसिक पदार्थांपेक्षा वरण-भात-तूप, कोशिंबीर, लाडू आदी सात्त्विक पदार्थ भोजनात असावेत.
२. चायनीजसारखे फास्टफूड; पाणीपुरी-भेळपुरी, पाव यांसारखे पदार्थ; मांसाहारी पदार्थ; कृत्रिम शीतपेये यांसारखे तामसिक अन्न टाळावे.
३. पाश्चात्त्य प्रथा दर्शवणार्या ‘बुफे’ पद्धतीचा नव्हे, तर पारंपरिक भारतीय पद्धतीचा अवलंब करावा !
छ. विवाहप्रसंगी अशास्त्रीय अन् अनिष्ट कृती टाळून विवाहविधीचे पावित्र्य जोपासा !
१. विवाहविधीच्या ठिकाणी पादत्राणे घालून जाऊ नका !
२. मंगलाष्टके चित्रपटगीतांच्या चालीत म्हणू नका !
३. वधू-वर एकमेकांना हार घालतांना त्यांना उचलून घेऊ नका !
४. अक्षता वधू-वरांवर न फेकता त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर वहा !
५. ‘बँड’ किंवा फटाके वाजवू नका, तर सात्त्विक सनई-चौघडा वाजवा !
६. ‘वराची पादत्राणे पळवून त्याची भरपाई (मोबदला) मागणे’ ही कुप्रथा टाळा !