आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये २८ एप्रिलला सकाळी भूकंपाचे एका मागोमाग एकूण ५ तीव्र धक्के बसले. ६.४ रिक्टर स्केल एवढे तीव्रतेचे हे धक्के होते. जवळपास अर्धा मिनिट हे धक्के जाणवत होते. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, अनेक घरांच्या भिंतीही तुटल्या, तसेच रस्त्यांना तडे गेले. एवढेच नाही, तर नारायणपूर येथील तांदुळाच्या शेतात भूमीतून पाण्याची धारच चालू झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment