हरिद्वार – हिंदु धर्मासाठी ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्र’ आवश्यक अन् प्रशंसनीय आहे. केंद्रातील प्रबोधनपर फलकांवरील लिखाण हे अटळ सत्य आहे. येथे सांगितली जाणारी माहिती अत्यंत चांगली आहे. अनेक लोक त्याचा लाभ घेत असून हे कार्य घराघरांत पोचायला हवे. हे कार्य, फलकांवरील लिखाण आणि ग्रंथ सनातन धर्मासाठी अत्यंत प्रशंसनीय आहे. हे कार्य सर्वांनीच केले पाहिजे. आपल्याला गाय, गंगामाता आणि अन्य नद्या यांना वाचवायचे आहे. भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवे, असे प्रतिपादन पंचदशनाम आवाहन आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी रामगिरिजी महाराज यांनी केले. येथील कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी स्वामीजींना केंद्राची माहिती दिली. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी महामंडलेश्वर स्वामी रामगिरिजी महाराज यांचा सन्मान करून ‘कुंभमहिमा’ विशेषांक भेट दिला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात