१. कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) असलेल्या रुग्णाच्या घराच्या आजूबाजूच्या परिसराशी संपर्क टाळावा.
२. संपर्क टाळणे अशक्य असल्यास परिसरात वावरतांना तेथील भिंतींना किंवा कठड्यांना आपला स्पर्श होणार नाही, असे पहावे.
३. उद्वाहकाचा (लिफ्टचा) वापर टाळावा.
४. उद्वाहकाचा वापर टाळणे शक्य नसल्यास त्याची बटणे दाबण्यासाठी थेट बोटांनी स्पर्श करू नये. यासाठी रद्दी कागदाचा वापर करावा आणि तो कागद कचरापेटीत टाकावा.
५. उद्वाहकाचा वापर करतांना त्याच्या आतील भिंतींना आपला स्पर्श होणार नाही, असे पहावे. तसेच आपल्याकडील साहित्य खाली ठेवणे टाळावे.
६. उद्वाहकाचा वापर करतांना त्यातील पंखा लावू नये.
७. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरात वावरतांना नियमित मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
८. घरात आल्यावर प्रथम हात-पाय साबण लावून स्वच्छ धुवावेत आणि मगच घरात इतरत्र वावरावे.