तुळजापूरची श्री भवानीदेवी, कोल्हापूरची श्री महालक्ष्मीदेवी, माहूरची श्री रेणुकादेवी, वणीची श्री सप्तशृंगीदेवी…. अशा सर्व देवी म्हणजे, आदिशक्ती श्री दुर्गादेवीची कार्यानुमेय अवतरलेली रूपे होत. जसे श्रीराम आणि श्रीकृष्ण ही श्रीविष्णूची रूपे
आहेत, तसेच हे आहे. यामुळे सर्व देवीरूपांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृती या सारख्याच आहेत. प्रस्तूत लघुग्रंथात अशा कृतींचे, तसेच सण, उत्सव इत्यादींच्या प्रसंगी केल्या जाणार्या देवीपूजनाशी संबंधित विशिष्ट कृतींचे शास्त्र दिले आहे.
देवतेचे पूजन करतांना पूजनातील कृतींचे शास्त्र कळले, तर त्या कृतींचे महत्त्व लक्षात येऊन पूजन अधिक श्रद्धेने होते. श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो आणि भावपूर्ण कृतीमुळे देवतेच्या तत्त्वाचा लाभ अधिक होतो. तसेच देवपूजेची कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरित्या केल्यास त्यातून मिळणारे फळ अधिक असते. हा उद्देश लक्षात घेऊन या लघुग्रंथात देवीपूजनाच्या कृतींसंबंधी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य विवरण दिले आहे.
देवीच्या विविध रूपांना कोणती फुले आणि का वहावीत, देवीची आरती कशी करावी, गौरी तृतीया आणि हरितालिका या दिवशी देवीपूजन केल्याने काय लाभ होतो, नवरात्रात घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन, कुमारिका-पूजन आदी कृती करण्याचे महत्त्व काय, देवीचा गोंधळ घालणे अशासारख्या कृतींचा उद्देश काय इत्यादी नाविन्यपूर्ण आणि सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञान या लघुग्रंथात दिले आहे.
या लघुग्रंथातील देवीपूजनाचे शास्त्र समजून घेऊन कृती करणार्यास देवीचा कृपाशीर्वाद लवकर संपादन होवो, ही
श्री गुरुचरणी प्रार्थना.
– संकलक
अर्पणमूल्य : रु. १२/-
संपर्क क्रमांक : ९३२२३१५३१७