१. स्वतः करणे महत्त्वाचे
‘श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवतो. ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही. श्राद्धविधी होणे, हे अधिक आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे.
२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे
पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने यांमध्ये पुष्कळ साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.
दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध कुटुंबातील कोणी करावे आणि त्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे या लेखात पाहू. यावरून हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो, हे लक्षात येर्ईल. !
३. सासरा आणि पती जिवंत असतांना स्त्रीचा मृत्यू झाल्यास तिचा अंत्यसंस्कार अन् श्राद्ध पतीने का करावे ?
विवाहितेचा मृत्यू झाल्यास तिच्या पतीलाच अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्याचा प्रथम अधिकार आहे; कारण पत्नीचा पतीशी देवाणघेवाण संबंध सर्वांत अधिक असल्याने पतीकडून तिच्या अपेक्षाही अधिक असतात. त्यामुळे इतरांपेक्षा पतीने केलेल्या विधीमुळे पत्नीच्या लिंगदेहाला गती मिळण्याची शक्यता जास्त असते.
४. विधवा स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचे श्राद्ध मुलाने का करावे ?
विधवा स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचा अंत्यसंस्कार आणि श्राद्ध करण्याचा अधिकार तिच्या मुलाला आहे; कारण स्त्रीचा इतरांपेक्षा प्रथम पतीशी आणि त्यानंतर स्वतःच्या मुलाशी देवाणघेवाण संबंध जास्त असल्याने योग्य घटकांच्या माध्यमातून केल्या जाणार्या श्राद्धविधीतील फलप्राप्तीही जास्त असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१.२००६, रात्री ८.३७)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’
५. श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला ‘संधी न देणारा हिंदु धर्म !’
मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे. एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.’ प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने सिद्ध केली आहे.
‘एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते’, असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे.
टीप – प्रत्येक मृत व्यक्तीचे श्राद्ध होईल अन् तिला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्मात श्राद्ध करण्याच्या अधिकाराच्या संदर्भात सांगितली आहे. मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे. एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास तिचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते, असेही धर्मात सांगितले आहे.
(यावरून हे लक्षात येते की, श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायची संधी हिंदु धर्म देत नाही ! हिंदु धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, जो प्रत्येक व्यक्तीची तिच्या मृत्यूनंतरही काळजी घेतो ! इतके पर्याय असूनही हिंदू श्राद्ध करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण साहाय्य करू शकणार ? – संकलक)
६. स्त्रियांनी श्राद्ध करणे
सूत्र क्र. ५ मध्ये मुलगी, पत्नी, आई आणि सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. असे असले, तरी सांप्रत काळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाहीत. याचे कारण असे की, पूर्वी स्त्रियांचे मौंजीबंधन होत असे. सध्या मात्र स्त्रियांविषयी हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे, हेही बंद झाले. मात्र आपत्काळात, म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपलब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे.
संतांचे श्राद्ध करावे लागत नाही; कारण देहत्यागानंतर ते भुवर्लोक किंवा स्वर्गलोकात अडकत नाहीत, तर त्यांच्या स्तराप्रमाणे जन, तप किंवा सत्य लोकात जातात. – (प.पू.) डॉ. आठवले (१६.१२.२०१४)
I have a query. can I contact u ?
Namaskar,
Thank you for contacting us.
Yes you can email your query to us at [email protected]
काशीला जाऊन आल्यावर श्राद्ध करू नये हे बरोबर आहे का ??
नमस्कार रामराव जी
श्राद्ध करण्यामागे दोन उद्देश असतात पहिला उद्देश – आपण केलेल्या तर्पण, पिंडदान इत्यादीमुळे पितरांना तृप्ती मिळते, आणि
दुसरा उद्देश – त्यांना कृतज्ञता म्हणून नियमितपणे पूजा, अन्न समर्पण इत्यादी करणे आवश्यक असते.
यापैकी पितरांना तृप्तता लाभावी या एका उद्देशाने पहायचे झाल्यास काशी इत्यादी तीर्थक्षेत्री श्राद्धविधी केल्यानंतर पुन्हा श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते कारण अशा श्राद्धामुळे पितरांना अक्षय स्वरूपात तृप्तता लाभते त्यामुळे त्यांना पुन्हा श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. मात्र असे असले तरीसुद्धा पितृदेवांप्रती कृतज्ञता म्हणून आणि एक कर्तव्य म्हणून नियमितपणे किमान वर्ष श्राद्ध आणि पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध करणे अत्यावश्यक आहे.
आपली
सनातन संस्था