१. ज्या साधकाची दृष्ट काढायची आहे, त्याने करायची प्रार्थना आणि नामजप

१ अ. दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना
‘हे भगवंता, तू आमच्याकडून ईश्वरी राज्य स्थापन करण्याचे कार्य करवून घेत आहेस. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मला आणि सर्व साधकांना व्याधीमुक्त करून आम्हाला चांगले आरोग्य अन् आयुष्य दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’
१ आ. दृष्ट काढतांना करायचा नामजप : श्री विष्णवे नम: ।
२. जो साधक दृष्ट काढणार आहे, त्याने करायची प्रार्थना आणि नामजप
२ अ. दृष्ट काढण्यापूर्वी करायची प्रार्थना
‘हे भगवंता, या साधकाची दृष्ट मला भावपूर्ण, परिपूर्ण आणि शरणागतभावाने काढता येऊ दे. ही दृष्ट काढल्याने मला ईश्वरी राज्य स्थापन करण्याच्या कार्यातील खारीचा वाटा उचलता येऊ दे. ही दृष्ट काढतांना तू माझे रक्षण कर, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’
२ आ. दृष्ट काढतांना करायचा नामजप : श्री विष्णवे नम: ।
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२१)