येत्या काळात १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार !

मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांची आगामी काळाविषयी भविष्यवाणी !

संत बाबा जय गुरुदेव

मथुरा येथील संत बाबा जय गुरुदेव यांनी वर्ष २०१२ मध्ये देहत्याग केला. उत्तर भारतात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. ते ठिकठिकाणी प्रवचने करत. मथुरा येथे त्यांचा जय गुरुदेव नामयोग साधना मंदिर नावाचा आश्रम आहे. सर्व देशांत फिरून त्यांनी जय गुरुदेव नामाचा प्रचार केला. यू ट्यूबवरील त्यांच्या अनेक प्रवचनांपैकी एका प्रवचनात त्यांनी आपत्काळ आणि त्यानंतर येणार्‍या सत्ययुगाविषयी माहिती सांगितली आहे. ती येथे लेख स्वरूपात देत आहोत.

 

कलियुगात मनुष्याने पाप आणि अधर्म
यांच्या सीमा पार करून विनाशाचा मार्ग शोधणे !

बाबा जय गुरुदेव यांनी म्हटले आहे की, कलियुगांतर्गत कलियुग येणार आहेत. कलियुग अजून संपणार नाही; मात्र मध्यंतरीच्या १ सहस्र वर्षांसाठी सत्ययुगाचे आगमन होणार आहे. आता कलियुग चालू होऊन केवळ ५ सहस्र ५०० वर्षांचा कालावधी झालेला आहे, म्हणजेच कलियुग संपण्यासाठी अजून सव्वाचार लाखांहून अधिक वर्षांचा कालावधी शेष आहे; मात्र या अल्प कालावधीतच मनुष्याने पाप आणि अधर्म यांच्या सीमा पार करून स्वत:च्या विनाशाचा मार्ग शोधला आहे. पाप आणि अधर्म यांचे प्रमाण कलियुगाच्या अंतिम टप्प्यात जेवढे असायला हवे होते, ते मनुष्याने आताच निर्माण केले आहे.

 

असे रोग येतील की, आधुनिक वैद्यांनाही त्याचे निदान लागणार नाही !

संपूर्ण विश्‍वात पावसाअभावी नद्या आणि झरे कोरडे पडतील. नदी, तलाव, झरे यांमध्ये थोडेही पाणी रहाणार नाही. त्यामुळे वीज बनवता येणार नाही, कारखाने बंद पडतील, कामकाज ठप्प होईल, पाण्याची पातळी खाली जाईल. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. पाण्याअभावी शेतकर्‍यांना धान्य पिकवण्यास अडचणी येतील. सध्या तुम्हाला पोटभर अन्न मिळत आहे. त्यामुळे तुम्ही ऐकत नाही. जेव्हा शेतकरी शेतात धान्य पिकवू शकणार नाही, तेव्हा तुमच्याकडे असलेल्या पैशांचा काहीच लाभ होणार नाही. भयानक भूकमारी पसरेल. संपूर्ण विश्‍वात हाहा:कार माजेल. एक वेळ अशी येईल की, लोक तुमच्याकडील पैसे किंवा सोने नाही, तर धान्याची चोरी करतील. धान्य चोरण्यासाठी लोक एकमेकांची हत्या करतील, रोगराई पसरेल. हे सर्व तुम्हीच केलेल्या पापांचे फळ असणार आहे. असे रोग येतील की, आधुनिक वैद्यांनाही रोगाचे निदान लागणार नाही.

 

येत्या कठीण काळात गुरुकृपा, सत्संग
आणि सेवा यांच्या आधारेच मनुष्याचे रक्षण होईल !

मांसाहार करणे, गोहत्या, मद्यपान, भ्रष्टाचार, व्यभिचार, अनाचार, दुराचार सोडणे आवश्यक आहे, अन्यथा विनाश अटळ आहे. पुष्कळ मोठ्या प्रमाणात भूकंप होणार आहे, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नाही. पापांचे प्रमाण पुष्कळ वाढते, तेव्हा निसर्ग अप्रसन्न होऊन हाहा:कार माजतो. काही महात्म्यांनी ही परिस्थिती रोखून ठेवली आहे; मात्र वेळ अल्प राहिला आहे. परिवर्तनाचा दिवस जवळ आला आहे. जे लोक महात्मे किंवा संत यांचे ऐकत नाहीत, ते कलियुग आणि सत्ययुग यांच्यामध्ये भरडले जातील. जे धर्माशी एकनिष्ठ रहातील, तेच यामध्ये वाचतील. अमेरिका, चीन, इंग्लंड, भारत, अरब देश या देशांवर रडण्याची वेळ येईल. येणार्‍या काळात जिवंत रहाण्यासाठी गुरुकृपा, सत्संग आणि सेवा यांचा आधार घेणे आवश्यक आहे. आताच वेळ आहे, शुद्ध शाकाहारी बना, मांसाहार टाळा, धर्माच्या मार्गावर चाला, महात्म्यांनी सांगितल्यानुसार आचरण करा. पुन्हा संधी मिळणार नाही अन्यथा तुमचा विनाश अटळ आहे.

 

कलियुगातील विश्‍वयुद्ध केवळ १८ मिनिटांचे होऊ शकते !

अधर्माच्या विनाशासाठी पुन्हा महाभारत होते. या विनाशामध्ये एकाच वेळी कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. प्रथम संपूर्ण विश्‍व आर्थिक संकटात सापडेल, धान्याच्या कमतरतेमुळे हाहाःकार माजेल. सर्व देश एकमेकांच्या विरोधात उभे रहातील. अनेक देशांनी युद्धासाठी विध्वंसक उपकरणांची सिद्धता केलेली आहे. सहस्रो मैल दूरवरून क्षेपणास्त्र येऊन ज्या देशावर पडेल, त्या देशाचा मोठ्या प्रमाणात विनाश होईल. हा विध्वंस इतका तीव्र असेल की, रात्री झोपतांनाचे चित्र वेगळे असेल आणि सकाळी जाग आल्यावर सारे चित्रच पालटलेले दिसेल. द्वापरयुगातील महाभारताचे युद्ध १८ दिवसांचे झाले होते, कलियुगातील युद्ध केवळ १८ मिनिटांचे होऊ शकते; मात्र त्या १८ मिनिटांमध्ये पुष्कळ नरसंहार होईल. पुष्कळ अकाली मृत्यू होतील. साधू-संतांना (महात्म्यांना) तुमचे रक्षण करावेसे वाटते; पण तुम्ही त्यांच्या संपर्कात येत नाही.

Leave a Comment