धनुर्मास या मासाचे पाच गुरुवार आणि शुक्रवार अत्यंत महत्त्वाचे असतात. चंद्राच्या संक्रांतीचे आधिक्य असणार्या या मासात भगवंताची आराधना, भगवंताचा नामजप, भगवत्कथा श्रवण, व्रत, दान, दीपदान, सत्संग आणि निष्काम कर्म करणे यांचे विशेष माहात्म्य आहे. या मासात येणार्या एकादशीला ‘वैकुंठ एकादशी’ म्हटले जाते. धनुर्मासात या दिवसाला सर्वाधिक महत्त्व असते.
१. धनुर्मासात करावयाची उपासना
अ. धनुर्मासात भगवान विष्णूच्या उपासनेला महत्त्व असते.
आ. या मासात सूर्योदयापूर्वी उठून स्नान केले जाते आणि सूर्योदय होण्यापूर्वी अर्धा घंटा आधी पूजा केली जाते. हिला ‘ब्राह्ममुहूर्तावर होणारी पूजा’ असे म्हटले जाते.
इ. या मासात भगवान विष्णूचे श्लोक म्हणतात.
२. फलप्राप्ती
अ. या मासात स्नान, दान आणि नामजप केल्याने सर्व मनोवांच्छित फलाची प्राप्ती होते.
आ. यज्ञ आणि दान यांमुळे रोगपीडा नष्ट होतात.
इ. धनुर्मासात केलेली विष्णूची उपासना सहस्र वर्षांच्या उपासनेसमान मानली जाते.’
– श्री विश्वशांति टेकडीवाला परिवार (८.१२.२०२०)