देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम
देहली – दत्त जयंती निमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली. सौ. माहुर यांनी दत्त जयंती, दत्ताचे अवतार, दत्ताची उपासना कशी करावी ?, नामजप कसा करावा ?, पितृपक्षामध्ये दत्ताची उपासना का करावी ? आदींविषयी माहिती सांगितली. या सत्संगाचा लाभ देहली आणि एन्.सी.आर्. येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.
दत्त जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन
दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले. कु. अक्षिता गुप्ता हिने ‘ऑडिओ’च्या माध्यमातून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप सामूहिक करून घेतला. या नामजपाचा लाभ देहली, एन्.सी.आर्., राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्रे
१. प्रवचन आणि सामूहिक नामजप या कार्यक्रमानंतर यू ट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर्स (वर्गणीदार) वाढले.
२. सामूहिक नामजपानंतर काही जिझासूंनी सांगितले की, जप एकाग्रतेने होत असतांना मन निर्विचार झाले.