मागील सत्संगात आपण सत्संग म्हणजे काय ? आणि सत्संगाचा आपल्याला कसा लाभ होतो ? याविषयी समजून घेतले होते. आजच्या सत्संगात आपण साधनेची अंगे कोणती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.
अष्टांग साधना
साधना करतांना गुरुकृपा अत्यंत महत्त्वाची असते. शिष्याची खरी आध्यात्मिक प्रगती गुरुकृपेनेच होते; म्हणूनच ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्लम्’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते’, असे म्हटले आहे. गुरु शिष्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिकवत असतात. घडवत असतात. गुरुकृपेच्या माध्यमातून व्यक्तीची ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ म्हणतात.
साधनेचे प्रकार
गुरुकृपायोगानुसार साधनेचे २ भाग आहेत. एक म्हणजे व्यष्टी साधना आणि दुसरी समष्टी साधना. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न, तर समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न ! कालमहिम्यानुसार व्यष्टी साधनेला ३५ टक्के, तर समष्टी साधनेला ६५ टक्के महत्त्व आहे. व्यष्टी साधनेच्या पायावरच समष्टी साधनारूपी इमारत उभी रहात असल्याने व्यष्टी साधनाही महत्त्वाची आहे. या दोन्ही साधना एकमेकांना पूरक आहेत. समष्टी साधनेविषयी आपण पुढच्या सत्संगांमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपण व्यष्टी साधनेच्या विविध अंगांची ओळख करून घेणार आहोत.
व्यष्टी साधनेची अंगे
व्यष्टी साधनेची अंगे कोणती आहेत ?, तर नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, इतरांविषयी प्रीती, स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भक्तीभाव जागृत करण्यासाठी प्रयत्न ! साधनेच्या या आठही अंगांनी साधना केली, तर जलद आध्यात्मिक उन्नती होते. आतापर्यंत आपण नामजप आणि सत्संग यांविषयी जाणून घेतले आहे. आज त्याच्या पुढचा भाग पाहूया.
सत्सेवा
सत्सेवा हा साधना-मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सत्सेवा म्हणजे नेमके काय ? सत् म्हणजे ईश्वर किंवा परब्रह्म ! सत्सेवा म्हणजे ईश्वराची सेवा ! आजच्या काळात प्रत्यक्ष ईश्वराची सेवा करणे अशक्य असल्याने संतांची सेवा करावी, असे म्हटले आहे. संत हे ईश्वराचे सगुण रूप आहे. ईश्वराला किंवा संतांना अपेक्षित असे करणे म्हणजे सत्सेवाच आहे. संतांना किंवा ईश्वराला काय अपेक्षित असते ?, तर धर्मप्रसार किंवा अध्यात्माचा प्रसार ! अध्यात्माचा म्हणजे साधनेचा प्रसार ही सर्वोत्तम सत्सेवा आहे. सत्सेवेच्या माध्यमातून संतांचे किंवा गुरुंचे मन जिंकता येते आणि त्या माध्यमातून गुरुकृपा कार्यरत होते. सत्सेवेला आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने १०० टक्के महत्त्व आहे. सत्सेवेमुळे अहंभाव न्यून व्हायलाही साहाय्य होते.
स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, ‘अन्नदान, प्राणदान, तसेच विद्यादान यांपेक्षाही धर्मदान सर्वश्रेष्ठ आहे.’ त्यामुळे आपणही प्रतिदिन थोडा वेळ तरी सत्सेवा करण्यासाठी द्यायला हवा. आपण पुढच्या सत्संगांमध्ये सत्सेवेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत; पण आता या सत्संगानंतर कुणाला आपल्या उपलब्ध वेळेमध्ये आपल्या कौशल्यानुरूप काही सेवा करायची इच्छा असेल, तर आपण आवर्जून आम्हाला संपर्क करा : Sanatan.org/sampark
त्याग
व्यष्टी साधनेचे पुढचे अंग आहे, सत्साठी त्याग करणे ! आध्यात्मिक उन्नतीसाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करायचा असतो. तनाचा त्याग म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी आपला देह झिजवणे. नामजप करणे, तसेच सतत ईश्वराच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे एकप्रकारे मनाचा त्याग आहे. समजा आवडता चित्रपट पहाणे किंवा सत्संगाच्या सिद्धतेसाठी साहाय्य करणे, असे आपल्यासमोर २ पर्याय आहेत आणि आपण चित्रपट पहाण्याऐवजी सत्संगाला प्राधान्य दिले, तर आपल्या मनाचा त्याग होतो; कारण या ठिकाणी मनाला सुख देणार्या विषयाचा भगवंतासाठी आपण त्याग केला आहे. धनाचा त्याग म्हणजे सत्कार्यासाठी धन अर्पण करणे. शास्त्र असे सांगते की, आपल्या धनाचा एक षष्ठमांश भाग धर्मकार्यासाठी अर्पण करावा; पण अर्पण करतांना ते ‘सत्पात्रे दान’ आहे कि नाही; म्हणजे ते दान योग्य ठिकाणी दिले जात आहे कि नाही, याचा विचार करणेही महत्त्वाचे असते.
ईश्वरप्राप्तीसाठी तन, मन, धन यांचा टप्प्याटप्प्याने त्याग करायचा असतो. आपण सर्कशीत पाहिले असेल की, उंच झुला घेणारी मुलगी तिच्या झुल्याची काठी सोडते, तेव्हा दुसर्या झुल्यावरील व्यक्ती मुलीला अलगद पकडून घेते. सर्कशीतील उंच झुल्यावरील मुलीने तिच्या हातातील झुल्याची काठी सोडल्याविना दुसर्या झुल्याच्या काठीला उलटा टांगलेला माणूस तिला धरू शकत नाही. त्याप्रमाणे साधकाने सर्वस्वाचा त्याग केल्याविना ईश्वर त्याला आधार देत नाही. त्याग करणे म्हणजे वस्तूंचा त्याग करणे नव्हे, तर ‘त्या वस्तूंविषयीची आसक्ती सुटणे’, हा त्याग होय. आरंभी गुरु शिष्याला त्याच्याकडे असलेल्या वस्तूंचा त्याग करायला लावतात. शेवटी त्याची आसक्ती सुटली की, त्याला भरपूर देतात. म्हणजेच गुरु शिष्याला भौतिक सुखात अडकू देत नाहीत.
भावजागृतीचे प्रयत्न
आपल्याकडे ‘भाव तेथे देव’ किंवा ‘भगवंत भावाचा भुकेला’, असे म्हटले आहे. आपल्या अंतःकरणात भगवंताविषयी ओढ निर्माण होणे, याला ‘भगवंताविषयी भाव असणे’, असे म्हणतात. जितक्या लवकर आपल्यामध्ये भाव निर्माण होईल आणि तो जितका अधिक जागृत राहील, तितक्या लवकर आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. रामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या अत्युच्च भावामुळे सतत श्री कालीमातेचे दर्शन व्हायचे. मीराबाईच्या भावामुळे श्रीकृष्णाने तिचे पदोपदी रक्षण केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताचा अंश असतोच. आपणही भगवंताविषयी प्रयत्नपूर्वक भाव वाढवून देवाच्या अनुसंधानात राहू शकतो. भाव वाढवण्यासाठी मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास, भाव निश्चितपणे वाढतो.
प्रीती (निरपेक्ष प्रेम)
व्यष्टी साधनेच्या अंतर्गत पुढचा टप्पा आहे, तो म्हणजे प्रीती; म्हणजेच निरपेक्ष प्रेम ! व्यवहारातील प्रेमात अपेक्षा असते. आपण समजा आपल्या एखाद्या नातेवाईकाला पुष्कळ साहाय्य केले; पण त्याने त्याची जाणीव ठेवली नाही, तर आपल्या मनाची काय अवस्था होते ? पुढच्या वेळी आपण त्या व्यक्तीला साहाय्य करतांना दहा वेळा विचार करतो. याला म्हणतात, अपेक्षायुक्त प्रेम. अध्यात्मामध्ये निरपेक्ष प्रेम किंवा प्रीती यांचा टप्पा गाठण्याला महत्त्व आहे. ईश्वर आपल्याला विनामूल्य सूर्यप्रकाश, प्राणवायू उपलब्ध करून देतो; पण आपण त्याविषयी किती वेळा ईश्वराचे आभार मानतो किंवा कृतज्ञता व्यक्त करतो ? बहुतेक वेळा ईश्वराच्या या कृपेची आपल्याला जाणीवही नसते. तरीही देवाने त्याचे देणे कधी कमी केले आहे का ? कुणी आभार मानो अथवा न मानो, जाणीव ठेवो अथवा न ठेवो, भगवंत जे द्यायचे ते देतोच. याला म्हणतात निरपेक्ष प्रेम ! साधना केल्याने सात्त्विकता वाढल्यावर व्यापकत्व आणि निरपेक्ष प्रेम निर्माण व्हायला आरंभ होतो. प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे रूप दिसू लागते. ‘वसुधैव कुटुम्बकम्।’ म्हणजे संपूर्ण विश्वाविषयीच कुटुंबभावना निर्माण होते.
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन
व्यष्टी साधनेचे पुढचे महत्त्वाचे २ टप्पे आहेत, ते म्हणजे स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन ! आपल्या प्रत्येकामध्येच स्वभावदोष आणि अहंकार असतो. कुणाला पटकन राग येतो, कुणाची छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड होते, कुणाला मनाविरुद्ध कृती झाली, तर ती स्वीकारता येत नाही, कुणाला खोटे बोलण्याची सवय असते, कुणाला प्रत्येक वेळी स्वतःला मान मिळावासा वाटतो किंवा इतरांनी कौतुक करावेसे वाटते. आपल्यापैकी प्रत्येकामध्ये स्वभावदोष आणि अहंकार कमी-अधिक प्रमाणात असतोच. साधनामार्गावर प्रवास करतांना हे दोष आणि अहं कमी करणे, त्यांचे निर्मूलन करणे महत्त्वाचे असते. ते केले नाही, तर दोषांमुळे होणार्या चुकांचे परिमार्जन करण्यात साधना व्यय होते. पुढच्या सत्संगामध्ये आपण याविषयी सविस्तर जाणून घेणारच आहोत.
Mala sabhav dosh sapdt nahit
Mala kahi kaltnahi krupa mala madt kara
Mala sadna kraychiahe
Mala krupya madt kara
नमस्कार,
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
कृपया या विषयाच्या ग्रंथांचा अभ्यास करू शकता. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयीचे ग्रंथ पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. – https://sanatanshop.com/shop/marathi-books/mr-spiritual-practice-for-god-realisation/mr-personality-development/
तसेच विनामूल्य घेण्यात येणाऱ्या आमच्या ऑनलाइन सत्संगांमध्ये सहभागी होऊ शकता – events.sanatan.org
भक्ती satsang link गुरुवारी adhavdhadabhar devavi
खूप छान