‘घडा’ या पारंपरिक गरबा नृत्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा साधिकेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने
‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

नवरात्रीमध्ये देवीतत्त्व नेहमीपेक्षा एक सहस्र पटींनी कार्यरत असते. गरबा खेळणे, म्हणजे टाळ्यांच्या नादात्मक सगुण उपासनेतून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे होय. गुजरातमध्ये मातृशक्तीचे प्रतीक म्हणून नवरात्रात अनेक छिद्रांच्या मातीच्या मडक्यात ठेवलेला दीप किंवा दिवा पूजला जातो. नवरात्रीत देवीची स्थापना (आरास) करून तिच्याभोवती पारंपरिक पद्धतीने गरबा खेळला जातो. गरबा खेळण्याचे विविध प्रकार आहेत, उदा. ताली (टाळ्या वाजवून नृत्य करणे), दांडिया (हातात दांडिया घेऊन नृत्य करणे), घडा (हातात घडा म्हणजे मातीचे मडके घेऊन नृत्य करणे) इत्यादी.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने गरबा नृत्याच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या साधिका सौ. नीता सोलंकी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘घडा’ हे पारंपरिक गरबा नृत्य सादर केले. या नृत्याचा त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

घडा नृत्य करतांना सौ. सोलंकी

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. सोलंकी यांनी हातांत मातीचा घडा घेऊन पारंपरिक गरबा नृत्य २० मिनिटे केले. या नृत्याचा त्यांच्यावर आणि घड्यावर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

टीप – घडा हातात घेऊन नृत्य करणे : नवरात्रीत गरबा खेळण्यापूर्वी तेथे देवीची आरास केली जाते. यामध्ये छिद्रे असलेल्या मातीच्या घड्यामध्ये (मडक्याच्या आतमध्ये) दीप प्रज्वलित करून ठेवला जातो. दीप प्रज्वलित करतांना त्यामध्ये देवीचे आवाहन केले जाते. गरबा नृत्य करतांना नृत्य करणारी व्यक्ती हातामध्ये एक घडा घेऊन तो कधी डोक्यावर, कधी कटीवर (कंबरेवर), कधी घडा झेलत (घडा हवेत उंचावून परत हातात झेलणे), तर कधी ‘आपण गोपी आहोत’, या भावाने नृत्य करते.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण

नृत्यानंतर सौ. सोलंकी यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे, तसेच त्यांनी नृत्यामध्ये उपयोगात आणलेल्या घड्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

चाचणीतील घटक घटकांतील नकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
घटकांतील
सकारात्मक
ऊर्जेची प्रभावळ
(मीटर)
‘इन्फ्रारेड’
ऊर्जा
‘अल्ट्राव्हायोलेट’
ऊर्जा
१. सौ. सोलंकी नृत्यापूर्वी ३.८९ ३.०२ २.४७
नृत्यानंतर २.०३ १.४० ६.३२
२. सौ. सोलंकी
यांनी नृत्यामध्ये
उपयोगात आणलेला
घडा
नृत्यापूर्वी नाही नाही २.४४
नृत्यानंतर नाही नाही ५.५३

२. निष्कर्ष

सौ. सोलंकी आणि घडा यांच्यावर घडा नृत्याचा सकारात्मक परिणाम झाला.

 

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. सौ. सोलंकी यांनी भावपूर्ण नृत्य केल्याने त्यांना देवतेचे चैतन्य मिळणे
आणि त्यांनी नृत्यामध्ये उपयोगात आणलेल्या घड्यातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

चाचणीतील गरबा नृत्याच्या प्रयोगात श्री दुर्गादेवीच्या चित्राला फुलांची आरास केली होती. तेथील वातावरण चैतन्यमय आणि भक्तीमय होते. त्यांनी देवीला आवाहन करून घडा नृत्य करण्यास आरंभ केले. घडा नृत्य झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘हा नृत्य प्रकार करत असतांना त्या श्रीकृष्ण समवेत नृत्य करत आहेत, श्रीकृष्ण त्यांच्या समवेत लीला करत आहे, असे जाणवून त्यांची भावजागृती झाली. नृत्याच्या शेवटी हातात घेतलेल्या घड्यामध्ये त्यांना बाळकृष्णाचे दर्शन झाले.’ सौ. सोलंकी यांच्यामध्ये देवतांप्रती भाव असल्याने त्यांना सुंदर अनुभूती आल्या. त्यांनी नृत्यसेवा भावपूर्ण केल्याने त्यांना देवतेचे चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक स्पंदने न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाली. त्यांनी नृत्यामध्ये उपयोगात आणलेल्या घड्यावर चैतन्याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे घड्यातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

थोडक्यात ‘नृत्य करतांना व्यक्तीचा जसा भाव असेल, तशा अनुभूती तिला येतात. तसेच नृत्य आध्यात्मिक स्तरावर केल्यास त्यातून आध्यात्मिक लाभ होतात’, हे या उदाहरणातून लक्षात येते.’

– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१५.१०.२०२०)

ई-मेल : [email protected]

Leave a Comment