मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम ! परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला. मग अशी मिरवणूक उत्सवमूर्तीला तरी आवडेल का ? नाही ना ! यासाठी पुढील गोष्टींकडे लक्ष द्या –
१. मिरवणूक काढण्यासाठी पैसे वा साहित्य बळाने गोळा करू नका, तर स्वेच्छेने दिलेली वर्गणी स्वीकारा !
२. मिरवणुकीचा आरंभ पवित्र स्थळापासून करा !
मिरवणुकीचा आरंभ मंदिरापासून करणे
३. प्रारंभी स्थानदेवता अन् आपली उपास्यदेवता यांना भावपूर्ण प्रार्थना करा !
४. मिरवणुकीत पुरुषांनी धोतर-सदरा वा सदरा-पायजमा, तर स्त्रियांनी नऊवारी वा सहावारी साडी नेसावी.
५. दोन, तीन किंवा चारच्या रांगेत मिरवणूक काढा ! रांगेत स्त्रिया अन् लहान मुले यांना मध्ये ठेवा !
६. रस्त्याच्या एका कडेने मिरवणूक न्या, म्हणजे वाहतुकीला अडथळा होणार नाही.
मिरवणूक रस्त्याच्या एका कडेने काढणे
७. मिरवणुकीत प्रथमोपचाराची, तसेच पाणी किंवा अन्य पेय देण्याची व्यवस्था करा !
८. उत्सवमूर्तीचे सुविचार / शिकवण सांगणारे फलक हाती धरा !
९. धार्मिक मिरवणुकीत भजने म्हणा वा नामजप करा ! राष्ट्रपुरुषांच्या मिरवणुकीत वीरश्रीयुक्त घोषणा द्या !
धार्मिक मिरवणुकीत भजने म्हणावी किंवा नामजप करावा
१०. लेझीम पथक, दांडपट्टा, लाठीकाठी यांसारख्या वीरश्रीयुक्त कलांचे प्रदर्शन ठेवा !
११. मिरवणुकीत मद्यपान, हिडीस नाच वा महिलांची छेडछाड होऊ देऊ नका !
१२. गुलालाची मुक्त उधळण करू नका !
१३. बँडबाजा किंवा बँजो यांसारखी वाद्ये वाजवू नका ! मिरवणूक वेळेत आरंभ करून वेळेतच संपवा !