अध्यात्मप्रसार, समाजाला साधनेविषयी मार्गदर्शन, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी समाजमनात जागृती करणे, या व्यापक उद्देशांनी सनातन संस्थेचे कार्य चालू आहे. विविध वयोगटांतील शेकडो साधक पूर्णवेळ सेवारत होऊन या धर्मकार्यात आपले योगदान देत आहेत. बरेच साधक संगणकीय, तसेच अन्य सेवा यांमुळे अनेक घंटे एकाच जागी बसून सेवा करतात, तर काही साधक स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करतात.
‘साधकांची शारीरिक क्षमता वाढून ते निरोगी रहावेत’, यासाठी ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम आहे. यासंबंधी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी आणि रुग्ण-साधकांना व्यायामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘पुनर्वसन’ (rehabilitation) करण्यासाठी सनातनच्या रामनाथी आणि देवद आश्रमांत पूर्णवेळ ‘फिजियोथेरपिस्ट’ची आवश्यकता आहे. ही सेवा पूर्णवेळ करणे शक्य नसल्यास आठवड्यातील काही दिवस वा दिवसातील काही घंटे या सेवेत सहभागी होता येईल.
फिजियोथेरपीचे ज्ञान असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी वा साधक ही सेवा करू शकतात, त्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी खालील सारणीनुसार माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१