अध्यात्मप्रसार, समाजाला साधनेविषयी मार्गदर्शन, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी समाजमनात जागृती करणे, या व्यापक उद्देशांनी सनातन संस्थेचे कार्य चालू आहे. विविध वयोगटांतील शेकडो साधक पूर्णवेळ सेवारत होऊन या धर्मकार्यात आपले योगदान देत आहेत. बरेच साधक संगणकीय, तसेच अन्य सेवा यांमुळे अनेक घंटे एकाच जागी बसून सेवा करतात, तर काही साधक स्वतःच्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करतात.
या साधकांवर उपचार करण्यासाठी सनातनच्या रामनाथी आणि देवद आश्रमांत ‘फिजिकल थेरपिस्ट’ची (मर्दन (मालिश), बिंदूदाबन, पंचकर्म, आयुर्वेदीय न्यूरोथेरपी, योगासने या विषयांतील जाणकारांची) आवश्यकता आहे. ही सेवा पूर्णवेळ करणे शक्य नसल्यास आठवड्यातील काही दिवस वा दिवसातील काही घंटे या सेवेत सहभागी होता येईल.
मर्दन, बिंदूदाबन, पंचकर्म, आयुर्वेदीय न्यूरोथेरपी, योगासने आदी विषयांमध्ये शिक्षण झालेले किंवा त्यामध्ये प्रावीण्य असलेले वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी वा साधक ही सेवा करू शकतात. इच्छुकांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी पुढील सारणीनुसार संबंधितांची माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१