आध्यात्मिक समस्या दूर करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था
वाराणसी (उत्तरप्रदेश) – आपल्या जीवनातील ८० टक्के समस्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. अशा समस्या दूर करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी साधना म्हणून आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेचा अधिकाधिक नामजप करावा, तसेच पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले. पितृपक्षाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने वाराणसी येथे दोन आणि गाझीपूर येथे एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. सौ. जुवेकर यांनी प्रारंभी सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा परिचय करून दिला. या वेळी त्यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये महालय श्राद्ध कसे करावे ? याविषयी माहिती सांगितली.
सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि
बिहार राज्यांमध्ये ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन
सनातन संस्थेच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने ९ ते १३ वर्षांच्या मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पितृदोष दूर करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. यासह श्राद्धाची शास्त्रीय माहिती देणार्या ‘अॅप’ संदर्भातही मुलांना माहिती देण्यात आली. उत्तरप्रदेशमध्ये युवा साधिका कु. जया सिंह आणि कु. सुमन सिंह यांनी, तर बिहारमध्ये युवा साधिका कु. निधी झा अन् कु. शिवांगी श्रीवास्तव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. या वेळी श्राद्धाविषयी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या बालसंस्कार वर्गाचा लाभ उत्तरप्रदेशातील गोरखपूर, लक्ष्मणपुरी, सुलतानपूर, गाझीपूर, वाराणसी, प्रयागराज, कानपूर, भदोही, अयोध्या, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर, गया, मुझफ्फरपूर, पाटणा या जिल्ह्यांतील अनेक मुलांनी घेतला.