सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

 

श्री गणपति Ganpati
सनातन-निर्मित धुम्रवर्णाची सात्त्विक श्री गणेशमूर्ती

 

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि उपयोग

अ. साधक-मूर्तीकारांनी ‘सेवा’ म्हणून मूर्ती बनवणे

सनातनचे साधक-मूर्तीकार सर्वश्री गुरुदास सदानंद खंडेपारकर, राजू लक्ष्मण सुतार आणि ज्ञानेश बाळकृष्ण परब (आताचे श्री. रामानंद परब) यांनी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती बनवली आहे. त्यांनी ‘कलेसाठी कला नव्हे, तर ईश्वरप्राप्तीसाठी कला !’ असा दृष्टीकोन ठेवून ‘सेवा’ म्हणून भावपूर्णरित्या मूर्ती बनवली असल्याने ती सात्त्विक झाली आहे. सात्त्विक श्री गणेशमूर्ती नेहमीसाठीही घरात ठेवणे लाभदायी आहे. याप्रमाणे आचरण करून सर्वांनाच श्री गणेशाचा अधिकाधिक आशीर्वाद प्राप्त करून घेता यावा, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !

श्री गणेशमूर्ती सात्त्विक कशी बनवावी, याविषयी सनातनचे साधक-मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (२००५)

 

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीची मापे

स्पंदनशास्त्रानुसार प्रत्येक आकृतीची स्पंदने तिच्यातील सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांमुळे वेगवेगळी असतात. आकृती पालटली की, तिच्यातील त्रिगुणांचे प्रमाणही पालटते. देवतेच्या मूर्तीसंदर्भातही असेच आहे. श्री गणपतीच्या हाताची लांबी, जाडी वा आकार यामध्ये किंवा मुकुटावरील कलाकुसरीमध्ये (नक्षीमध्ये) थोडा जरी पालट झाला, तरी एकूण स्पंदनांत पालट होतो. यासाठी मूर्तीचा प्रत्येक अवयव घडवतांना सूक्ष्मातील स्पंदने नीट जाणून घेऊन मूळ तत्त्वाशी मिळतीजुळती ठरतील, अशा स्पंदनांचा तो घडवावा लागतो. सनातनच्या साधक-मूर्तीकारांनी असा सूक्ष्मातील अभ्यास करून सात्त्विक मूर्ती घडवली आहे. पुढे या गणेशमूर्तीची चित्रे तिच्या मापांसह देत आहोत. पुढील चित्रांत दाखविलेली ३४.५ सें.मी. उंचीची गणेशमूर्ती एक प्रमाण म्हणून दिली आहे. भाविकाला ज्या आकाराची मूर्ती बनवून घ्यावयाची असेल, त्या आकारानुसार त्या प्रमाणात मूर्तीची मापे पालटतील.

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीची मापे
सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेश मूर्तीची मापे
आकृतीतील क्रमांकांचे विवरण

१ – पाटाच्या खालपासून श्री गणपतीच्या मुकुटाच्या कळसाचे वरचे टोक : ३४.५ सें.मी.

२ – पाटाची लांबी : २४.५ सें.मी.

३ – पाटाची रुंदी : २२.५ सें.मी.

४ – पाटाची जाडी : २.५ सें.मी.

५ – मुकुटाची लांबी : ७.८ सें.मी.

६ – मुकुटाची रुंदी : ९.० सें.मी.

७ – मुकुटाची उंची : ७.३ सें.मी.

८ – मुकुटाच्या मागील बाजूच्या रिंगची लांबी : १०.१ सें.मी.

९ – दोन्ही डोळ्यांमधील अंतर : ३.० सें.मी.

१० – पाठीमागच्या दोन्ही हातांमधील अंतर : २७.५ सें.मी.

११ – श्री गणपतीच्या पोटाची रुंदी : १०.४ सें.मी.

१२ – दोन्ही गुडघ्यांमधील अंतर : २०.७ सें.मी.

१३ – श्री गणपति बसलेल्या चौरंगाची लांबी : २२.०० सें.मी.

१४ – श्री गणपति बसलेल्या चौरंगाची रुंदी : १४.५ सें.मी.

१५ – श्री गणपति बसलेल्या चौरंगाची उंची : ४.५ सें.मी.

 

१. साधक-मूर्तीकारांनी सेवा म्हणून मूर्ती बनवणे

सनातनचे साधक-मूर्तीकार सर्वश्री गुरुदास सदानंद खंडेपारकर, राजू लक्ष्मण सुतार आणि रामानंद परब यांनी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मशास्त्रानुसार श्री गणेशमूूर्ती बनवली आहे. त्यांनी कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला ! असा दृष्टीकोन ठेवून सेवा म्हणून भावपूर्णरित्या मूर्ती बनवली असल्याने ती सात्त्विक झाली आहे.

२. मूर्ती बनवत असतांनाच तिच्या सात्त्विकतेविषयी आलेली अनुभूती

सनातनच्या गोवा येथील आश्रमात श्री. खंडेपारकर श्री गणेशाची मूर्ती बनवत असण्याच्या कालावधीत आश्रमात दोन-तीन संत आले होतेे. त्यांनी आश्रमात पाऊल टाकताच म्हटले की, येथे पुष्कळ सात्त्विकता जाणवत आहे. – सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३. श्री गणेशाची मूर्ती दोन प्रकारांत उपलब्ध

ही गणेशमूर्ती रंगीत, तसेच धूम्रवर्ण (धुरकट रंगात), अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. रंगीत मूर्ती ही सगुण तत्त्वाशी, तर धूम्रवर्ण मूर्ती ही निर्गुण तत्त्वाशी संबंधित आहे.

४. पर्यावरणपूरक मूर्ती

ही मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवली असून ती पाण्यात विरघळणार्‍या रंगांनी रंगवलेली आहे. विसर्जन केल्यावर मूर्ती पाण्यात विरघळून जाते. त्यामुळे या मूर्तीच्या विसर्जनाने पर्यावरणाची हानी होत नाही. उलट या मूर्तीच्या विसर्जनाने जलाशय / नदी यांचे पाणी सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

५. मूर्तीविषयी आलेल्या अनुभूती

अ. सनातनच्या श्री गणेशमूर्तीमुळे घरातील वातावरण पूर्वीपेक्षा चांगले होणे : ७.१०.२००७ या दिवशीश्री गणपतीची धूम्रवर्णाची मूर्ती आणली आणि घरातले वातावरणच पालटले. आता आम्ही दोघे पती-पत्नी पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ सकारात्मक झालो आहोत. श्री गणपति घरात आल्यापासून आमच्यात अगदी टोकाचे भांडण केवळ एकदाच झाले. – सौ. सोनाली पोत्रेकर, पाषाण, पुणे.

आ. मूर्तीकडे पाहून मी शांती अनुभवली. गेल्या कित्येक वर्षांत कोणत्याही देवळात मी इतकी शांती अनुभवली नव्हती. – श्री. कृष्णा भिमनाथानी, मुंबई

 

सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीची काही वैशिष्ट्ये

निर्गुणाकडे चाललेली मूर्ती

मूर्ती पूजणार्‍याचा भाव आणि त्याची साधना यांमुळे मूर्तीतील सत्त्वगुण वाढायला लागतो. मूर्तीतील सत्त्वगुण जसजसा अधिक वाढतो, तसतशी मूर्ती निर्गुण तत्त्वाची बनत जाते. मूर्तीकडे पाहून हलके वाटणे किंवा ध्यान लागणे, नामजप आपोआप चालू होणे, मूर्तीकडे पाहिल्यावर मूर्ती न दिसता केवळ प्रकाश दिसणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास, मूर्ती निर्गुणाकडे चालली आहे, असे समजावे. मूर्ती निर्गुणाकडे चालली असेल, तर तिच्यातून आनंदाची स्पंदने जाणवतात. मूर्ती आणखी निर्गुणाकडे चालली असल्यास तिच्यातून शांतीची स्पंदने जाणवतात. सनातनच्या मूर्तीकार-साधकांनी बनवलेली श्री गणेशाची मूर्ती, हे याचे एक उदाहरण आहे.

 

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त वर्णिलेले श्री गणेशाचे मूर्तीविज्ञान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !’

6 thoughts on “सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती”

  1. आम्हाला घ्याच्या असल्यास अशी मूर्ती कुठे मिळेल किंवा आपण कुरियर ने मगउ शकतो का

    Reply
    • नमस्कार,

      क्षमा करा पण संस्थेनी या गणेशमूर्ती विक्रीसाठी बनवलेल्या नाहीत. सात्त्विक श्री गणेशमूर्ती कशी असावी हे लोकांना कळण्यासाठी केवळ काही संख्येनीच या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. तुम्ही स्थानिक मूर्तीकारांना दाखवून अशा प्रकारे मूर्ती सिद्ध करून घेऊ शकता.

      Reply
    • Namaskar,

      We are sorry to inform you that Sanatan Sanstha has not prepared these Ganesh murtis for selling purpose. Only a few were prepared to educate people about how sattvik Shri Ganesh murti should be as per Dharmashastra. You can encourage local sculptors to prepare similar sattvik Shri Ganesh murtis.

      Reply
  2. वर दिलेल्या मापाच्या गणेशमूर्तीची किंमत काय आहे? कुरियर ने महाराष्ट्रात कोठेही मिळेल काय?

    Reply
    • नमस्कार,

      क्षमा करा पण संस्थेनी या गणेशमूर्ती विक्रीसाठी बनवलेल्या नाहीत. सात्त्विक श्री गणेशमूर्ती कशी असावी हे लोकांना कळण्यासाठी केवळ काही संख्येनीच या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. तुम्ही स्थानिक मूर्तीकारांना दाखवून अशा प्रकारे मूर्ती सिद्ध करून घेऊ शकता.

      Reply

Leave a Comment