सातारा – गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७ दिवसांची जिल्हास्तरीय ‘ऑनलाईन’व्याख्यानमाला घेण्यात आली. याला जिज्ञासू, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक आणि धर्माभिमानी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्याख्यानमालेत आपत्काळातील गणेशोत्सव, गणेशोत्सवामागील शास्त्र आणि धर्माचरणाची आवश्यकता, मंदिरांचे महत्त्व, नैसर्गिक आपत्ती आणि त्याची आध्यात्मिक कारणे, सात्त्विक आहाराचे महत्त्व आणि अग्निहोत्राचे महत्त्व, हिंदु धर्मातील महिलांचे स्थान आणि शौर्यजागृती, प्रथमोपचाराची आवश्यकता, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श हिंदवी स्वराज्य आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता हे विषय घेण्यात आले. या ‘ऑनलाईन’ व्याख्यानाला प्रतिदिन सरासरी १५० हून अधिक, तर सामूहिक अथर्वशीर्ष पठणाला ४१४ उपस्थिती होती.