देहली – महालय श्राद्ध किंवा पितृपक्ष याविषयी समाजाला शास्त्रीय माहिती मिळावी आणि पितृदोषापासून त्यांचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहली अन् फरीदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. ही प्रवचने अनुक्रमे २९ आणि ३० ऑगस्ट या दिवशी घेण्यात आली. देहली येथील प्रवचनाचा ५२, तर फरिदाबाद येथील प्रवचनाचा ४८ जिज्ञासूंनी लाभ घेतला.
यावर्षी २ ते १७ सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे. या वेळी पितृपक्षाविषयी माहिती देतांना श्राद्धाचा उद्देश, इतिहास, महत्त्व आणि श्राद्धाचे विधी यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप का करावा ? याविषयी माहिती देण्यात आली. या प्रवचनामध्ये सनातन संस्थेच्या साधिका सौ. मंजुला कपूर, सौ. राजरानी माहूर आणि सौ. संदीप मुंजाल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले.