१. दत्ताचा नामजप करणे
‘सध्या अनेकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२ ते १७ सप्टेंबर २०२० या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
जे जिज्ञासू स्वतःला होत असलेला वाईट शक्तींचा त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायांच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.
जे जिज्ञासू उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप न्यूनतम १ घंटा होईल, असे पहावे; मात्र पूर्वजांचा त्रास जाणवल्यास त्यांनीही बसून अन् मुद्रा करून दत्ताचा नामजप करावा.
२. दत्ताला प्रार्थना करणे
पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दिवसभरात मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.
३. ज्यांना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा.
असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.’