बोधप्रद प्रश्‍नोत्तरी

जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकण्याचे मूळ कारण सांगून कधीही कोणतीही इच्छा (कामना) होतच नाही अशा स्थितीला पोहोचले, तर मोक्ष मिळेल ह्याचा सोप्या भाषेत बोध करून देणारी, सनातन संस्थेचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांनी लिहीलेली ‘बोधप्रद प्रश्‍नोत्तरी’ !

पू. अनंत आठवले

 

प्रश्‍न उत्तर
१. पुन्हा पुन्हा जन्म-मरण का ? प्रारब्धामुळे
२. प्रारब्ध का ? पुण्य-पापामुळे
३. पुण्य-पाप का ? ह्या आणि आधींच्या जन्मांमध्ये केलेल्या चागंल्या – वाईट कर्मामुळे
४. चागंली – वाईट कर्मे का ? सुख मिळविण्याच्या आणि अनिष्ट (सकंट इ.) टाळण्याच्या आपल्या इच्छा पूर्ण  करण्यासाठी
५. मग इच्छा सोडल्याने जन्म- मरण टळले का ? नाही
६. तर कशाने ? इच्छा सुटल्याने
विवेचन : इच्छा सोडणे ही साधक-अवस्था असते तर इच्छा सुटणे (मनात मुळीच न उठणे ) ही सिद्धअवस्था आहे
७. इच्छा सुटल्याने मोक्ष मिळेल ह्या म्हणण्याला काही शास्त्रीय आधार आहेे का ? हो महाभारतात, उपनिषदामंध्ये सांगितलेले आहे (सनातन संस्थेच्या ‘गीताज्ञानदर्शन’ ग्रथांत परिशिष्ट १, सत्रू ५  मध्ये हा विषय वेगळ्या प्रकारे आला आहेे आणि तिथे ह्या ग्रथांतींल उदाहरणे  दिली आहेत)
८. मुळात इच्छांचा आरंभच होऊ नये ह्यासाठी काय करावे ? हे जवळ जवळ अशक्य आहे
९. का शक्य नाही ? दोन कारणे आहेत.

अ. सर्व सृष्टि, उत्पत्ती, स्वभावत: पतनोन्मुख असते.

आ. मनुष्य जन्मजात बहिर्मुख असतात.

१०. ही कारणे कशी ? अ. सृष्टीच्या उत्पत्तीपासून पुढे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलीयुग हा क्रम आहे. असे होत नाही की आधी कलीयुग होते. मग ईश्वराच्या अवतारकार्याने संत-महात्म्यांच्या उपदेशाने मनुष्य सुधारत गेला आणि अधिक उन्नती होत जाऊन क्रमश: द्वापर, त्रेता आणि शेवटी सत्ययुग आले. नाही होत असे. सर्व उत्पत्ती पतनोन्मुखच असते. अधोगतीच होत असते.  हेच वास्तव आहे

आ. मनुष्य जन्मजात बहिर्मुख असतात. मनुष्य लहान बाळ म्हणून जन्माला येतो. पंचज्ञानेंद्रिय कार्यरत होतात. शरीरात ह्या इद्रिंंयानीं बाहेरच्याच गोष्टी कळण्याची व्यवस्था आहे, त्यामुळे त्या इद्रिंयानीं बाह्य विषयांच सुख घेणे सुरु होते. त्या सुखाचीं इच्छा करू नये हे कळण्याइतकी बुद्धी विकसित झाललेी नसते. जन्मत:च मनुष्य विकसित बुद्धीचा, काय करावे आणि काय करू नये ह्या विवकेासह जन्मत नाही. त्याची इद्रिंये बहिर्मुखच असतात. ती बाहेर विषयसुखांकडे आकर्षित होतात आणि त्या त्या सुखांच्या आणखी आणखी इच्छा होऊ लागतात. हाच क्रम आहे. क्रम कधी उलटा नव्हता, उलटा कधीच असणार नाही आणि उलटवू शकत नाही.

११. मग ह्यावर उपाय काय ? अ. हा विवेक करणे (ज्ञानयोग ) की

१. इच्छापूर्तीच्या मागे लागून केवळ सुखच सुख, दुःख नाहीच, अशी स्थिती आयुष्यात कधीही येत नसते.

२. कोणाच्याही सर्व इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत.

३. इच्छा पूर्ण झाली तरी त्याने मिळणारे सुख अनित्य असते.  ते सदा सर्वदा टिकत नाही.

४. इच्छांनां अंत नसतो. एक पूर्ण झाली की दुसरी , मग तिसरी. आपला अंत होईल पण इच्छांचा अंत होणार नाही.

५. इच्छा पूर्ण करून मोक्ष मिळत नसतो.

हा विवेक अंत:करणावर नीट ठसला, त्याचा बोध झाला की इच्छा होणे उणावत जाऊन शेवटी थांबेल.

किंवा

आ. मनात इच्छा उठू नयेत म्हणून मनाला दुसरीकडे गुंतवणे, जसे ईश्‍वराच्या निष्काम भक्तीत (भक्तीयोग), लोकांची नि:स्वार्थ सेवा करण्यात (कर्मयोग), ध्यान लावणे (ध्यानयोग) अथवा भगवदगीतेत सांगितलेल्या अनेक योगांपंकैी कोणताही योग. ह्या साधनेत आनंद येऊ लागला की इच्छा पूर्ण करण्याची ओढ उणावत जाईल.

 – पू. अनंत आठवले (२३-१०-२०१९)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment