सनातन संस्थेच्या वतीने मुलांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन

 

वाराणसी (उत्तरप्रदेश) – १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील मुलांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व’ या विषयावर उत्तरप्रदेशातील मुलांना सनातन संस्थेची युवा साधिका कु. यस्तिका सिंह हिने, तर बिहारच्या मुलांना कु. रूपम चौरसिया हिने मार्गदर्शन केले. या वेळी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. तसेच मुलांची भारत आणि स्वातंत्र्यदिन या विषयांवर तोंडी प्रश्‍नोत्तरे घेण्यात आली. या वेळी मुलांनी ‘नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरे करणार, वाढदिवस कुलेदवतेचा आशीर्वाद घेऊन तिथीनुसार साजरा करणार आणि स्वदेशी वस्तू वापरणार’, असे सांगितले. कार्यक्रमाचा समारोप ‘वन्दे मातरम्’ या गीताने झाला. या कार्यक्रमांचा दोन्ही राज्यांतील ११० मुलांनी लाभ घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment