- प्रसिद्धीसाठी हपापलेल्या अशा लोकांना भक्त म्हणता येईल का ? ‘आपण काहीतरी वेगळे करतो’, असे दाखवून लक्ष वेधून घेण्याचा हा खटाटोप आहे !
- ज्या श्री गणेशाला भक्तीभावाने पुजायचे, त्याची मूर्ती विसर्जनानंतर खाऊन टाकायची ही विकृती आहे. गणेशभक्त अशा विकृतीला स्वीकारतील का ?
- हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, ते यातून दिसून येते !
पणजी – श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आसगाव येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांनी चॉकलेटपासून श्री गणेशमूर्ती बनवल्या आहेत. याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘मी मुंबई येथे काम करत असतांना ही संकल्पना सर्वांनाच ठाऊक होती. १० वर्षांपूर्वा ही संकल्पना सुचली होती आणि त्या वेळी तिला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. मी ते करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु मला वेळच मिळाला नाही. आता कोरोना महामारीमुळे मी घरी आहे. त्यामुळे ‘चॉकलेटपासून श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी ही चांगली वेळ आहे’, असे समजून मी प्रारंभ केला. गणेशमूर्ती चॉकलेटची असल्यामुळे ती खाऊ शकत असल्याने चतुर्थीला श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यावर अनेक जण ती खाऊ शकतील. (ज्या श्री गणेशाला भक्तीभावाने पुजले, त्याची मूर्ती गोमंतकीय गणेशभक्त कधीच खाणार नाहीत ! – संपादक)
(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
इतर पंथियांमुळे पर्यावरणाचा र्हास होत असतांना काहीही न बोलणार्या राधिका वाळके यांचे फुकाचे बोल !
(म्हणे) ‘पर्यावरणाविषयीचे सामाजिक दायित्व आणि भुकेलेल्यांची काळजी !’
पर्यावरणाविषयी सामाजिक दायित्वासमवेतच या उत्सवात कुणीही भुकेला रहाणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. (शाडूमातीच्या मूर्तीपासून पर्यावरणाची कोणती हानी होते ? याचा कधी वाळकेबाईंनी अभ्यास केला आहे का ? हिंदु धर्मात पर्यावरणाचा विचार करूनच सर्व धार्मिक कृती ठरवल्या गेल्या आहेत. पर्यावरणाची एवढीच काळजी आहे, तर कारखान्यांमधून नदीत सोडण्यात येणारे पाणी वाळकेबाई यांनी रोखण्यासाठी प्रयत्न करावेत ! भुकेल्यांविषयी कणव असेल, तर त्यांना जेवण किंवा न्याहारी देण्यासाठी वाळकेबाईंनी वेगळी व्यवस्था करावी, यासाठी चॉकलेटची गणेशमूर्ती बनवणे, हा उपाय होऊ शकत नाही ! – संपादक) गोव्यात ही संकल्पना नवीन आहे. त्यामुळे लोकांनी ही संकल्पना स्वीकारणे कठीण आहे. यासाठी उत्तम दर्जाचे चॉकलेट वापरले आहे. पुढच्या वर्षी ग्राहकांच्या मागणीनुसार ही मूर्ती वेगवेगळ्या आकारांमध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न मी करीन. ही गणेशमूर्ती १०.५ इंचांची असून तिचे वजन सुमारे अडीच किलो आहे. (अडीच किलो उत्तम दर्जाचे चॉकलेट सामान्य व्यक्तीला परवडेल का ? वाळकेबाई कुठल्या आधारावर ‘उत्सवात कुणीही भुकेला जाणार नाही, याची काळजी घेतली जाईल’, असे म्हणतात ? भुकेल्याने अडीच किलो महागडे चॉकलेट खायचे आणि उर्वरीत गणेशोत्सव भुकेले रहायचे का ? – संपादक)